-
ऋजुता लुकतुके
भारताच्या महिला टेबलटेनिस चमूने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कोरियाचा ३-२ ने पराभव करून उपांत्य फेरीत मजल मारली आहे. त्या ओघात भारतासाठी पहिलं टेबलटेनिस सांघिक पदकही निश्चित केलं आहे. या विजयात ऐहिका मुखर्जीने महत्त्वाची भूमिका निभावली. जागतिक क्रमवारीत ९२ व्या स्थानावर असलेल्या ऐहिकाने कोरियाच्या सहाव्या मानांकित आणि ८ व्या मानांकित खेळाडूंना हरवलं. मनिका बात्रानेही आपला सामना जिंकला. त्यामुळेच भारताचा विजय निश्चित झाला. (Women’s Table Tennis Team)
(हेही वाचा- Dipa Karmakar : दीपा कर्माकरच्या कारकीर्दीतील ५ महत्त्वाच्या घटना )
अहिका आणि मनिका बात्रा (Manika Batra) यांनी पहिले दोनही सामने जिंकले आणि भारताला २-० ने अनपेक्षित आघाडी मिळवून दिली. पण, त्यानंतर कोरियाने २-२ अशी बरोबरी साधली. त्यामुळे सगळी मदार पुन्हा एकदा ऐहिकावरच होती. तिने जागतिक क्रमवारीत सोळाव्या स्थानावर असलेल्या जिऑन जिहीला ५ गेममध्ये हरवून हा सामना जिंकला. त्याचबरोबर भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेश नक्की केला. (Women’s Table Tennis Team)
THE HISTORIC MOMENT FOR INDIA 🇮🇳🤩
India beats Paris Olympics Bronze Medalist Team South Korea 🇰🇷 3-2 in thriller…!!! 💥
INDIA ASSURED FIRST EVER MEDAL FOR WOMEN’S TEAM AT ASIAN TABLE TENNIS C’SHIP 🏆
[ 🎥 – ATTU Live ] pic.twitter.com/0hcw8dZgsW
— The Khel India (@TheKhelIndia) October 8, 2024
कोरिया हा टेबलटेनिसमधील एक बलाढ्य संघ आहे. त्यांना हरवत भारताने पदकापर्यंत मजल मारली आहे. गेल्या काही वर्षात भारतीय महिला चमूने जागतिक स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics) ही महिला चमूने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. ऐहिका ऑलिम्पिकमधील भारतीय संघात नव्हती. पण, अर्चना कामथच्या निवृत्तीनंतर ऐहिकाला संघात स्थान मिळालं. तिने या संधीचं सोनं केलं आहे. (Women’s Table Tennis Team)
(हेही वाचा- Congress मध्ये छुप्या बैठकांचे सत्र, पक्षनेतृत्त्वासमोरील टेन्शन वाढले)
ऐहिकाने या वर्षाच्या सुरुवातीला जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या सुन यिंगशाचा पराभव केला होता. तेव्हापासून तिला जायंट कीलर असं नाव पडलं आहे. भारतासाठी दक्षिण कोरियाविरुद्ध मनिका बात्रा आणि अहिका मुखर्जी (Ayhika Mukherjee) प्रत्येकी दोन सामने खेळल्या. तर एक सामना श्रीजा आकुजा (Sreeja Akula) खेळली. पैकी श्रीजा आणि मनिका यांनी एकेक सामना गमावला. तर ऐहिकाने आपले दोन्ही सामने जिंकले. (Women’s Table Tennis Team)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community