Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकासाठी भारत पाकिस्तानला जाणार नाहीच, ’या’ हायब्रीड मॉडेलची चर्चा

Champions Trophy 2025 : भारताने ‘या’ आशियाई देशात खेळायला मान्यता दिली आहे

74
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकासाठी भारत पाकिस्तानला जाणार नाहीच, ’या’ हायब्रीड मॉडेलची चर्चा
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकासाठी भारत पाकिस्तानला जाणार नाहीच, ’या’ हायब्रीड मॉडेलची चर्चा
  • ऋजुता लुकतुके 

चॅम्पियन्स करंडकासाठीचा समझोता आता दृष्टिपथात आला आहे. निकाल भारताच्या बाजूने होताना दिसत आहे. म्हणजेच भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही. भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला तर अंतिम सामनाही पाकिस्तानबाहेरच खेळवावा लागेल. ज्या त्रयस्थ ठिकाणी भारताचे सामने होतील तो देश असेल संयुक्त अरब अमिराती. ते ठिकाण असेल दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडिअम. (Champions Trophy 2025)

(हेही वाचा- Indian Army: दोन जवानांचे दहशतवाद्यांकडून अपहरण! एक जवान तावडीतून सुटला)

चॅम्पियन्स करंडक २०२५ ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये पुढील वर्षी फेब्रुवारीत होणार आहे. मात्र, या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार की नाही, याबाबत कोणतीही पुष्टी झालेली नाही. पाकिस्तानने आपल्याकडून स्पर्धेची पूर्ण तयारी चालवली आहे. १९ फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यान त्यांनी वेळापत्रकही जारी केलं आहे. भारताचे सामने लाहोरला एकाच ठिकाणी खेळवण्याची तयारी इतके दिवस पाकिस्तानने दाखवली आहे.  (Champions Trophy 2025)

गेल्या काही काळापासून भारत (India) आणि पाकिस्तानमधील संबंध चांगले नाहीत, भारतीय संघ या देशाचा दौरा करत नाही. यामुळे, दोन्ही संघांमध्ये कोणतीही मालिका खेळली जात नाही, फक्त आयसीसी स्पर्धा आणि आशिया चषका दरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये सामने खेळले जातात. टेलिग्राफच्या बातमीनुसार, चॅम्पियन्स करंडक स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर खेळवली जाऊ शकते. या स्पर्धेचा अंतिम सामना लाहोर येथे होणार आहे. पण जर भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला तर हा सामनाही पाकिस्तानबाहेर होईल, हा सामना दुबईत होण्याची शक्यता आहे.  (Champions Trophy 2025)

(हेही वाचा- Sanjay Raut: हरियाणात काँग्रेसचा पराभव फाजील आत्मविश्वासामुळे; राऊतांचा सामनातून टोला)

अशा परिस्थितीत, असे मानले जात आहे की भारतीय संघ आपले साखळी सामनेही दुबईतच खेळू शकेल. उपांत्य फेरीत पोहोचल्यानंतरही मैदानात बदल केले जातील. सध्या दोन्ही उपांत्य फेरीचे सामने पाकिस्तानमध्येच खेळले जाणार आहेत. दुबई, अबुधाबी आणि शारजाह सारख्या मैदानांवर भारताचे गटवार साखळी सामने,, उपांत्य आणि अंतिम सामने होऊ शकतात. आशिया चषक २०२३ देखील अशाच संकरित मॉडेलमध्ये खेळला गेला होता, ज्यामध्ये सर्व देशांचे सामने पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आले होते, तर टीम इंडियाने आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळले आणि अंतिम सामनाही येथेच झाला. म्हणजे तोच फॉर्म्युला पुन्हा एकदा आजमावता येईल. (Champions Trophy 2025)

तब्बल ८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर चॅम्पियन्स करंडकाचे पुनरागमन होत आहे. त्याच वेळी २९ वर्षांनंतर पाकिस्तानी भूमीवर आयसीसीचीही पहिली स्पर्धा आहे. ड्राफ्ट वेळापत्रकानुसार भारतीय संघाला आपले सर्व सामने लाहोरमध्ये खेळायचे आहेत. भारतीय संघ २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. यानंतर २३ फेब्रुवारीला न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना खेळणार आहे. त्याच वेळी, भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा बहुचर्चित सामना १ मार्चला प्रस्तावित आहे. पण जर भारतीय संघ पाकिस्तानला गेलाच नाही तर या सर्व सामन्यांच्या ठिकाणी बदल दिसू शकतात.  (Champions Trophy 2025)

(हेही वाचा- Virat Kohli : विराट कोहली, रोहित शर्मा जेव्हा फुटबॉल खेळतात…)

चॅम्पियन्स करंडक शेवटी २०१७ मध्ये खेळवला गेला होता. पाकिस्तानने अंतिम फेरीत भारताचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. भारताने २०१३ मध्ये शेवटची चॅम्पियन्स करंडक स्पर्धा जिंकली आहे. (Champions Trophy 2025)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.