Dasara Melava 2024 : महाराष्ट्रात यंदा होणार ५ प्रमुख दसरा मेळावे

119
Dasara Melava 2024 : महाराष्ट्रात यंदा होणार ५ प्रमुख दसरा मेळावे
Dasara Melava 2024 : महाराष्ट्रात यंदा होणार ५ प्रमुख दसरा मेळावे

गेल्या काही वर्षांपासून अनेक पक्ष आणि संघटना यांचे मेळावे राज्यभरात होत आहेत. हे महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांचे समीकरण ठरलेले आहे. यंदा शिवसेना (Shiv Sena), उबाठा गट, मनोज जरांगे (Manoj Jarange), पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचेही मेळावे दसऱ्याच्या दिवशी होणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघही प्रतिवर्षी विजयादशमी उत्सव साजरा करत असतो. यामुळे राजकीय वर्तुळात दसऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (Dasara Melava 2024)

(हेही वाचा – Shree Siddhivinayak Ganapati Mandir: श्री सिद्धिविनायक मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या कपाळी आता भगवा टिळा लागणार!)

९ ऑक्टोबर रोजी उबाठा गटाने दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज केला आहे. यामध्ये दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना देण्यात आली. यात बाळासाहेब ठाकरेंच्या दसरा मेळाव्याची काही क्षणचित्रे देखील दिसून येत आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या देखील भाषणाची झलक दाखवण्यात आली आहे.

आझाद मैदानावर शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा

शिवसेनेमध्ये फूट पडल्यावर शिवाजी पार्कसाठी शिवसेनेच्या दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ झाली होती. मात्र यानंतर ठाकरे यांनी शिवतीर्थावर आपला मेळावा घेतला. यंदा शिंदे गटाकडून बीकेसीवर मेळाव्याची तयारी होत असताना आज शिंदे गटाचा दसरा मेळाव्याचे मैदान आता बदलण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये तिसरा दसरा मेळावा हा आझाद मैदानावर घेण्यात येणार आहे.

विधान परिषदेवर वर्णी लागल्यानंतर भाजप आमदार पंकजा मुंडे यांचा यंदा पहिला दसरा मेळावा आहे. याला मंत्री धनंजय मुंडे उपस्थित रहाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दसऱ्याच्या निमित्ताने मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे देखील नारायण गडावर मराठा बांधवांचा मेळावा घेणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव 23 ऑक्टोबर 1928 मध्ये सुरू झाला. देशाची सद्यःस्थिती, आगामी आव्हाने याबाबत सरसंघचालक मार्गदर्शन करीत असल्याने त्याकडे दिशादर्शक म्हणून पाहिले जाते.

महाराष्ट्रातील प्रमुख दसरा मेळावे

1. शिवसेना (उबाठा) शिवाजी पार्क.

2. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, रेशीमबाग, नागपूर.

3. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आझाद मैदान, मुंबई.

4. पंकजा मुंडे, सावरगाव घाट.

5. मनोज जरांगे पाटील, नारायणगड, पहिले वर्ष (Dasara Melava 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.