मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरात (Shree Siddhivinayak Ganapati Mandir) देश-विदेशातील लाखो भाविक गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात. गणेशोत्सवादरम्यान मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक सेलिब्रेटिदेखील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येत असतात. आता या भाविकांसाठी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने एक निर्देश जारी केला आहे.
(हेही वाचा-“हम साथ साथ हैं म्हणणारे आता हम तुम्हारे हैं कौन?” म्हणतायत; Devendra Fadnavis यांचं टीकास्त्र)
श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या (Shree Siddhivinayak Ganapati Mandir) गाभाऱ्यात येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या कपाळी भगवा टिळा लावण्याचे निर्देश श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदानंद सरवणकर, राज्यमंत्री दर्जा आणि न्यासाचे सदस्य यांच्यातर्फे देण्यात आले आहे. यामुळे गणपती मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आशिर्वादाचा भगवा टिळा लावला जाणार आहे.
श्री सिद्धिविनायक मंदिराला इतके महत्त्व का आहे?
प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर (Shree Siddhivinayak Ganapati Mandir) हे भारतातील प्रमुख देवस्थानांपैकी एक धार्मिक स्थळ आहे. या मंदिरात जगभरातून लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. अनेक सुप्रसिद्ध व्यक्ती, अभिनेते, अभिनेत्री, उद्योजक गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. दर मंगळवारी, संकष्टी चतुर्थीलाही भाविकांची मोठी गर्दी तेथे असते. पायी चालत मंदिरापर्यंत येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community