Garba Pass Scam : कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीच बनवले गरब्याचे बनावट पास; सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे लाखो रुपयांचा गैरप्रकार उघडकीस

228
Garba Pass Scam : कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीच बनवले गरब्याचे बनावट पास; सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे लाखो रुपयांचा गैरप्रकार उघडकीस

देशभरात नवरात्री उत्सवाची धूम सुरू असून विविध ठिकाणी गरबा-दांडिया कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उत्सवात बाहेरील लोकांपासून सुरक्षा राखण्यासाठी प्रवेश तिकीट किंवा पासेसद्वारे दिला जातो. मात्र, मुंबईतील काही कॉलेज विद्यार्थ्यांनी याचाच गैरफायदा घेत ‘गरबा पास स्कॅम’ रचल्याचे समोर आले आहे. (Garba Pass Scam)

(हेही वाचा – Mohammed Zubair : ‘अल्‍ट न्‍यूज’चा सहसंस्‍थापक महंमद जुबेर याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल)

मुंबईच्या बोरिवली परिसरात रायगड प्रतिष्ठान आयोजित ‘रंग रास गरबा’ कार्यक्रमासाठी ६०० बनावट सीझन पास तयार करून विकण्याच्या आरोपात सहा विद्यार्थ्यांच्या टोळीला बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी, वय १८ ते २० वर्षेआहे. हे सर्वजण कॉलेज विद्यार्थी असून त्यात मनोज वेशी चावडा (१९), अंश हितेश नागर (२०), भव्य जितेंद्र मकवाना (१९), राज शैलेश मकवाना (१९), यश राजू मेहता (१९) आणि केयूर जगदीश नाई (२०) यांचा समावेश आहे. टोळीने नवरात्री काळात कमी दिवसांत मोठी कमाई करण्याच्या उद्देशाने ६०० बनावट गरबा पास तयार केले. त्यांची एकूण किंमत अंदाजे ६ लाख रुपये होती. (Garba Pass Scam)

(हेही वाचा – Shree Siddhivinayak Ganapati Mandir: श्री सिद्धिविनायक मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या कपाळी आता भगवा टिळा लागणार!)

मुंबईत कॉलेज विद्यार्थ्यांनी केलेल्या ‘गरबा पास’ स्कॅममधून, ६०० बनावट पासेस विकून लाखोंची कमाई करणार होत्. मात्र सोमवारी (७ ऑक्टोबर) संध्याकाळी, दोन तरुणांनी हे पास वापरून गरबामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. सिक्युरिटी चेकिंग दरम्यान पासवरील बारकोड स्कॅन न झाल्याने सुरक्षारक्षकांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी चौकशीदरम्यान या टोळीचा भांडाफोड केला व बनावट पास बनवण्याचे साहित्य जप्त केले. आरोपींनी आणखी किती पासेस तयार केले आहेत, किती जणांना विकले आहेत आणि या स्कॅममध्ये इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. (Garba Pass Scam)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.