प्रभु श्रीराम, स्वामी समर्थ आणि अन्य हिंदू देवी-देवतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये करणारे ज्ञानेश महाराव यांना (Dyanesh Maharao) भाजप कार्यकर्त्यांनी चांगलाच धडा शिकवला. भाजपचे दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांच्या नेतृत्वाखालील चमूने ज्ञानेश महाराव यांच्या मुखातून माफी वदवून घेतली.
(हेही वाचा – Navratri 2024 : भाजपचा मराठी दांडिया उत्सव; नवरात्रोत्सवात सांस्कृतिक सोहळ्याच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क)
संभाजी ब्रिगेडचा राज्यस्तरीय मेळावा अलीकडे वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडला. या मेळाव्यात ज्ञानेश महाराव नामक व्यक्तीने प्रभु श्रीराम, सीतामाई, स्वामी समर्थ आणि ब्राह्मण समाजाबद्दल अवमानकारक वक्तव्ये केली. त्याविरोधात हिंदूंकडून तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला. हिंदू देवी-देवतांविषयी अशी वक्तव्ये ऐकून संतप्त झालेल्या दक्षिण मध्य मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांनी थेट महाराव यांच्या कार्यालयात धडक दिली आणि त्यांना माफी मागायला लावली.
दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांच्या नेतृत्वाखालील या चमूत नगरसेविका राजश्री शिरवडकर, जिल्हा महामंत्री विलास आंबेकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कनौजिया, जिल्हा सचिव आनंद भंडारी, जिल्हा महामंत्री पुष्पा आडारकर, वॉर्ड अध्यक्ष संतोष गुरव यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
काय म्हणाले ज्ञानेश महाराव?
माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या असतील, तर मी माफी मागतो. भविष्यात प्रभू श्रीराम, स्वामी समर्थ किंवा अन्य कोणत्याही देवतेविषयी अपशब्द काढणार नाही, अशी कबुली देत ज्ञानेश महाराव (Dyanesh Maharao) यांनी या दुष्कृत्याबद्दल माफी मागितली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community