मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नालासोपारा शहरात पुन्हा कट्टरपंथींचा उन्माद समोर आला आहे. नालासोपारातील अनेक भागात नवरात्रोत्सव (Navratri Puja) उत्साहात साजारा केला जातो. मात्र नालासोपारा पश्चिमेला असलेल्या ऑरेज सोसायटी नावाच्या एका बिल्डींगमध्ये हिंदू (Hindu) धर्मीयांना मुसलमान रहिवाशांकडून नवरात्रोत्सव साजरा करण्यापासून रोखले जात होते. मात्र दुसरीकडे मुसलमानाचे हिरवे झेंडे ईद, मोहरम यांसारख्या इतर सणांच्या दिवशी सरार्स लटकलेले आढळले. या सोसायटीतील हिंदू (Hindu) रहिवाशांनी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी निवेदन दिले असता. तेथील मुस्लिम लोकांना नवरात्रोत्सव करण्यास नकार दर्शवला.
( हेही वाचा : ‘दौंडचे पशूवधगृह बंद न झाल्यास आंदोलन करू’; Mahant Ramgiri Maharaj यांचा नगरपालिका प्रशासनाला इशारा)
या प्रकरणामुळे हिदू आणि मुस्लिम समाज समोरासमोर उभे ठाकले आहेत. त्यानंतर हिंदू रहिवाशांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तेव्हा पोलिसांनी ही शांतता राखण्याचे आणि सामंजस्याने विषय सोडवण्यास सांगितले. मात्र तरीही मुस्लिम लोकांनी नवरात्रोत्सवाला (Navratri Puja) विरोध दर्शवला. या उलट मुस्लिम समाज सोसायटीत अवैधरित्या मदरसा चालवत आहे. त्यामुळे ऑरेज सोसायटीत हिंदू (Hindu) संघटनेचे कार्यकर्ते जमले आणि त्यांनी दुर्गापुजेचे मागणी केली. दरम्यान या वादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community