World Mental Health Day म्हणजे काय? या दिवसाचे वैशिष्ट्य काय?

90
World Mental Health Day म्हणजे काय? या दिवसाचे वैशिष्ट्य काय?

जागतिक मानसिक आरोग्य दिन (World Mental Health Day) हा मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा केला जातो. त्यासाठी १५० पेक्षा जास्त देशांतले सदस्य, मानसिक आरोग्य संस्था आणि मानसिक आरोग्य संघटनेच्या पुढाकाराने १९९२ साली पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता. दरवर्षी या दिवशी मानसिक आजार आणि त्या आजारांमुळे जगभरातील लोकांच्या जीवनावर होणारे मोठे परिणाम यांकडे लक्ष वेधण्यासाठी हा जागतिक मानसिक आरोग्य दिवस साजरा केला जातो.

(हेही वाचा – Gang Rape in Mumbai : सामूहिक बलात्काराचा बनाव रचणारी महिला सापडली)

याव्यतिरिक्त या दिवशी मानसिक आरोग्य व्यावसायिकांना चर्चा करण्याची आणि त्यांच्या कामावर नव्याने प्रकाश टाकण्याची संधी देतो. त्यांमुळे जगभरात मानसिक आरोग्याला प्राधान्य दिले जाते. ऑस्ट्रेलियामध्ये या दिवसाच्या निमित्ताने लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी मानसिक आरोग्य सप्ताह साजरा केला जातो. उपमहासचिव रिचर्ड हंटर यांच्या पुढाकाराने १० ऑक्टोबर १९९२ साली प्रथमच जागतिक मानसिक आरोग्य दिन (World Mental Health Day) साजरा करण्यात आला. १९९४ सालापर्यंत या दिवसाची सर्वसाधारणपणे मानसिक आरोग्याविषयी लोकांना जागरूक करणे याशिवाय कोणतीही विशिष्ट थीम नव्हती.

(हेही वाचा – Navratri 2024 : भाजपचा मराठी दांडिया उत्सव; नवरात्रोत्सवात सांस्कृतिक सोहळ्याच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क)

पण १९९४ साली तत्कालीन सरचिटणीस यूजीन ब्रॉडी यांच्या सूचनेनुसार जागतिक मानसिक आरोग्य दिन पहिल्यांदाच एका थीमसह साजरा करण्यात आला. त्या वर्षी “जगभरातील मानसिक आरोग्य सेवांची गुणवत्ता सुधारणे” ही थीम ठरवलेली होती. जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या दिवशी WHO द्वारे जगभरातील आरोग्य मंत्रालय आणि नागरी समाज संस्थांमधले मजबूत संबंध वापरून मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दल जागरुकता निर्माण करून समर्थन दिले जाते. डब्ल्यूएचओ म्हणजेच WHO ही संस्था टेक्निकल आणि कम्युनिकेशन संसाधने विकसित करण्यास देखील समर्थन देते. २०१८ सालच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या (World Mental Health Day) दिवशी थेरेसा मे यांनी जॅकी डॉयल-प्राइस यांची यूकेचे पहिले आत्महत्या प्रतिबंध मंत्री म्हणून नियुक्ती केली. त्यावेळी यूके सरकारने पहिल्यांदाच जागतिक मानसिक आरोग्य शिखर परिषद आयोजित करताना हे जाहीर केलं.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.