Hikmat Udhan : जालन्यात ठाकरे गटाला खिंडार, सहसंपर्क प्रमुख हिकमत उढाण करणार शिवसेनेत प्रवेश

300

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जालन्यात ठाकरे गटाला (Uddhav Thackeray) खिंडार पडले आहे. दि. १० ऑक्टोबर रोजी उबाठा गटाचे सह-संपर्कप्रमुख हिकमत उढाण (hikmat udhan) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून प्रवेश करणार आहेत. हिकमत उढाण (hikmat udhan)शरद पवार गटाच्या राजेश टोपेंच्या (Rajesh Tope) विरोधात घनसावंगी विधानसभेतील प्रबळ दावेदार मानले जातात.

( हेही वाचा : Navratri 2024 : भाजपचा मराठी दांडिया उत्सव; नवरात्रोत्सवात सांस्कृतिक सोहळ्याच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क

घनसावंगी विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे राजेश टोपे (Rajesh Tope)यांचे उढाण कट्टर विरोधक समजले जातात. हिकमत उढाण आतापर्यंत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटात कार्यरत होते. मात्र उबाठा गट महाविकास आघाडीत सामील झाल्यापासून घनसावंगी मतदारसंघात रस्सीखेच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यंदा राजेश टोपेंना (Rajesh Tope)घनसावंगी मतदारसंघातून उमेदवारी जवळपास निश्चित आहे. त्यामुळे उढाण यांनी वेगळा रस्ता निवडला आहे. त्यामुळे हिकमत उढाण दि. १० ऑक्टोबरला पक्षप्रवेश करणार आहेत.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.