Chandivali Assembly Constituency : चांदिवलीत दिलीप लांडे यांचा उमेदवारीपूर्वीच प्रचारात जोर

173
Chandivali Assembly Constituency : चांदिवलीत दिलीप लांडे यांचा उमेदवारीपूर्वीच प्रचारात जोर
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

राज्यात शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी महायुतीच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणूक (Chandivali Assembly Constituency) लढवली जात असली तरी अद्याप कोणाही उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नाही. परंतु उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नसली तरी मुंबईत मात्र हमखास तिकीट मिळणाऱ्या उमेदवारांकडून सध्या जोरदार प्रयत्न केला. चांदिवली विधानसभा क्षेत्रातील विद्यमान आमदार दिलीप मामा लांडे यांनी आपल्या विभागात आतापासून घरोघरी जाऊन प्रचाराला सुरुवात केली असून या प्रचाराला पदयात्रेचे गोंडस नाव त्यांनी दिले आहे.

चांदिवली विधानसभेत सन २००९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे नसीम खान हे निवडून येत असतानाच त्यांची सत्ता शिवसेनेचे उमेदवार असलेल्या दिलीप माला लांडे यांनी सन २०१९ च्या निवडणुकीत उलथवून टाकली. या निवडणुकीत लांडे यांचा केवळ ४०९ मतांनी विजय झाला. दिलीप लांडे यांना ८५ हजार ८७९ मते तर नसीम खान यांना ८५ हजार ४७० मते मिळाली होती. तर नुकत्याच झालेल्या उत्तर मध्य मुंबईतील चांदिवली विधानसभेत महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांना ९८,६६१ मते मिळाली होती, तर महाविकास आघाडीचे उमेदवार वर्षा गायकवाड यांना १ लाख ०२ हजार ९८५ मते मिळाली होती. म्हणजेच महायुतीचा आमदार असतानाही चांदिवलीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला तब्बल ४ हजारांची आघाडी आहे. (Chandivali Assembly Constituency)

(हेही वाचा – Navratri 2024 : भाजपचा मराठी दांडिया उत्सव; नवरात्रोत्सवात सांस्कृतिक सोहळ्याच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क)

चांदिवलीचा मतदारसंघ काँग्रेसला सोडल्यास यांना मिळू शकते उमेदवारी 

मात्र, येत्या विधानसभा निवडणुकीत दिलीप मामा लांडे यांना उमेदवारी मिळणार हे पक्के असल्याने लांडे यांनी लोकसभेतील महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांच्या आकडेवारीवरून सावध होत चांगल्याप्रकारे मतांची बांधणी करून चांदिवलीत फडकलेल्या भगव्याच्या जागी पुन्हा हिरवा झेंडा फडकण्यास न देण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे दिलीप लांडे यांन आपल्या महापालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये आता पदयात्रा काढून एकप्रकारे गल्लोगल्ली फिरत एकप्रकारे प्रचार करताना दिसत आहे. दोनच दिवसांपूर्वी लांडे यांनी कुर्ला पश्चिम काजूपाडा येथील प्रत्येक रस्त्यांवरून आणि गल्ल्यांमधून फिरताना दिसत असल्याने एकप्रकारे मामांचा प्रचारात आधीपासून बाजी मारल्याचे दिसून येत आहे. (Chandivali Assembly Constituency)

मात्र, महाविकास आघाडीमध्ये ही जागा उबाठा शिवसेना लढणार की काँग्रेस यामध्ये अजूनही एकमत झालेले नसून उबाठा शिवसेनेला यंदा चांदिवलीची जागा लढवून आपल्याकडे आणायची असल्याने काँग्रेसला ही जागा न देण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे वांद्रे पूर्वच्या बदल्यात चांदिवलीचा मतदारसंघ सोडण्याचा विचार सुरु असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे चांदिवलीचा मतदारसंघ काँग्रेसला सोडल्यास नसीम खान यांना उमेदवारी मिळू शकते आणि नसीम खान निवडणूक रिंगणात उतरल्यास मामा यांना निवडणूक कठिण जावू शकते. त्यामुळे नसीम खान निवडणूक रिंगणात उतरतील याच विचाराने दिलीप मामा लांडे यांनी या मतदार संघाची पुन्हा एकदा जोरदार बांधणी करून यंदा ४०९ मतांनी नव्हे तर चार हजार मतांनी निवडून यायचा निर्धार केला आहे. त्यामुळे त्यादृष्टीकोनात मामा लांडे यांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच प्रचाराची पहिली फेरी पूर्ण करण्यावर भर दिल्याचे पहायला मिळत आहे. (Chandivali Assembly Constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.