Mahayuti कडून विधानसभा समन्वयकांची नियुक्ती

132
  • प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या सूक्ष्म नियोजनाचा भाग म्हणून महायुतीने (Mahayuti) राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात समन्वयकांची नियुक्ती केली आहे. महायुतीच्या नेत्यांनी बुधवारी (०९ ऑक्टोबर) संयुक्त पत्रकार परिषद घेत या समन्वयकांची यादी जाहीर केली. या यादीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रत्येकी एका पदाधिकाऱ्याचा समावेश आहे.

(हेही वाचा – Mumbai Metro 3 तिसऱ्याच दिवशी तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत, प्रवासी नाराज)

भाजपाच्या यादीत समन्वयक म्हणून अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे विद्यमान आमदार रवी राणा यांचा समावेश आहे. राणा हे युवा स्वाभिमानी पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. लोकसभा निवडणुकीत राणा यांची पत्नी नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमानी पक्षाचा राजीनामा देत भाजपामध्ये प्रवेश केला होता. भाजपाने लगेच त्यांना अमरावती लोकसभेची उमेदवारी दिली होती. आता राणा यांचा समावेश भाजपाने आपल्या समन्वयकांच्या यादीत केल्याने ते आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे. (Mahayuti)

(हेही वाचा – Navratri Puja : नालासोपाऱ्यातील सोसायटीत दुर्गापुजेला मुसलमानांचा विरोध आणि अवैध मदरशाला पाठबळ; हिंदू संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक)

या निवडणुकीत विधानसभा समन्वयकांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमधील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन बूथ स्तरापर्यंत प्रभावी नियोजन करत समन्वय साधण्याची जबाबदारी या समन्वयकांची असणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, भाजपाने जिंतूरसाठी माजी आमदार रामप्रसाद कदम बोर्डीकर, कोपरी पाचपाखाडीसाठी आमदार निरंजन डावखरे, गोरेगावसाठी जयप्रकाश ठाकूर, मुंबादेवीसाठी माजी आमदार अतुल शहा, परळीसाठी माजी खासदार प्रीतम मुंडे, आष्टीसाठी माजी आमदार सुरेश धस, वाईसाठी माजी आमदार मदन भोसले यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. (Mahayuti)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.