Uttam Jankar : ‘हिंदूंच्या भावना इतक्या स्वस्त नाहीत’; उत्तम जानकरांच्या ‘त्या’ विधानावर भाजप प्रवक्त्याने सुनावले खडेबोल!

284
Uttam Jankar : 'हिंदूंच्या भावना इतक्या स्वस्त नाहीत'; उत्तम जानकरांच्या 'त्या' विधानावर भाजप प्रवक्त्याने सुनावले खडेबोल!
Uttam Jankar : 'हिंदूंच्या भावना इतक्या स्वस्त नाहीत'; उत्तम जानकरांच्या 'त्या' विधानावर भाजप प्रवक्त्याने सुनावले खडेबोल!

इंदापूर येथे हर्षवर्धन पाटील यांनी दि. ७ ऑक्टोबर रोजी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यावेळी अनेक नेत्यांनी आपल्या
भाषणांममध्ये शरद पवारांच्या नावाने ढोल वाजवले. त्याचदरम्यान शरद पवार गटाचे उत्तम जानकर (Uttam Jankar) म्हणाले की, बारामतीत बसवलेला दीड दिवसाचा गणपति दारू प्‍यायला म्‍हणून शरद पवारांनी त्‍याचे विसर्जन केले, असे वादग्रस्त विधान जानकरांनी (Uttam Jankar) केले. त्यांच्या विधानाचा रोख इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांच्‍यावर होता. मात्र त्याचवेळी हिंदूंच्या प्रथम पुजनीय दैवत असणाऱ्या गणरायाची विटंबना झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

(हेही वाचा :  Navratri Puja : नालासोपाऱ्यातील सोसायटीत दुर्गापुजेला मुसलमानांचा विरोध आणि अवैध मदरशाला पाठबळ; हिंदू संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक)

मात्र जानकरांचे वादग्रस्‍त विधान सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित होत असून यावर संतप्‍त प्रतिक्रिया उमटल्‍या आहेत. भाजपनेही उत्तम जानकर (Uttam Jankar) यांच्‍या विधानाचा आक्रमक समाचार घेतला आहे. भाजपचे प्रवक्‍ते अजित चव्‍हाण (Ajit Chavan) यांनी जानकरांच्‍या विधानाचा समाचार घेतला. ते म्‍हणाले की, उत्तम जानकर (Uttam Jankar) यांना जी भाषा कळते, त्‍याच भाषेत त्‍यांना उत्तर दिले पाहिजे. उत्तम जानकर यांना उलटे टांगून बदडले पाहिजे. हिंदूंच्‍या भावना इतक्‍या स्‍वस्‍त नाहीत, शरद पवारांच्‍या सभेतून वाट्टेल ते बरळणाऱ्या जानकरांनी (Uttam Jankar) लक्षात घ्यावे की, महाराष्‍ट्रात हिंदुत्‍वनिष्‍ठ जनता तुम्‍हाला चौकाचौकांत बडवेल. ‘व्‍होट जिहाद’मुळे मिळणार्‍या आयत्‍या मतांमुळे तुम्‍ही सोकावले आहात. त्यामुळे जानकरांसारख्या अट्टल दारूड्या आणि वाया गेलेल्‍या पुढार्‍याच्‍या अतिशय घाणेरड्या विधानाचा मी तीव्र शब्‍दांत निषेध करतो, असे खडेबोल चव्हाण (Ajit Chavan) यांनी जानकरांनी (Uttam Jankar) सुनावले.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.