- विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्यात शिवसेना, भाजपा (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असल्याने मुंबई महापालिकेत केवळ शिवसेना आणि भाजपाचेच अधिकारी ऐकत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत असतानाच बुधवारी (०९ ऑक्टोबर) महापालिकेचे अधिकारी एक महिन्यांपासून वेळच देत नसल्याने तसेच काम मंजूर करत नसल्याने अखेर भाजपाच्या माजी महापालिका पक्षनेत्याला अतिरिक्त आयुक्तांच्या दालनाबाहेरच ठिय्या मारावा लागला. मात्र, हे माजी पक्षनेत्याने ठिय्या मारताच अतिरिक्त आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी त्यांना बोलावून त्यांचे काम मंजूर केले. त्यामुळे मुंबई महापालिकेत आता भाजपाच्या नगरसेवकांचेही ऐकत नसून याठिकाणी शिवसेनेचाच माजी नगरसेवकांची चलती असल्याचे पहायला मिळत आहे.
(हेही वाचा – Mumbai Metro 3 तिसऱ्याच दिवशी तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत, प्रवासी नाराज)
मालाड पूर्व येथील प्रभाग क्रमांक ४३ मध्ये नवीन पोस्ट ऑफिस बनवण्यासाठी कार्यालयाची जागा उपलब्ध व्हावी यासाठी स्थानिक भाजपाचे माजी नगरसेवक व महापालिकेचे भाजपा (BJP) पक्षनेते विनोद मिश्रा यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु आहे. मात्र, याबाबत तसेच विभागातील अन्य विकासकामांसदर्भात अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपीन शर्मा यांच्याशी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करूनही त्यांची ना भेट होत नाही या विकासकामांच्या मंजुरीबाबत कोणतीही माहिती दिली जात. त्यामुळे याचा निषेध नोंदवण्यासाठी विनोद मिश्रा यांनी थेट अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या दालनाबाहेर आंदोलन करण्यासाठी ठिय्या मारला. त्यामुळे त्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना अतिरिक्त आयुक्तांनी बोलावून मिश्रा यांना दालनात घेऊन यावे अशाप्रकारच्या सूचना केल्या. त्यानुसार अधिकाऱ्यांनी हा निरोप मिश्रा यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना सन्मान पूर्वक दालनात नेण्याचा प्रयत्न केला. परंतु मिश्रा यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी अतिरिक्त आयुक्तांना बाहेर बोलवा असा हट्ट धरला. त्यावरून मिश्रा यांनी अधिकाऱ्यांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर अखेर ते उठून डॉ. विपीन शर्मा यांच्या दालनात निघून गेले आणि काही वेळाने हास्य मुद्रेने बाहेर पडले.
(हेही वाचा – Jammu and Kashmir : जंगलात सापडला अपहृत जवानाचा मृतदेह)
त्यानंतर काही वेळाने पुन्हा एकदा विनोद मिश्रा यांना विपीन शर्मा यांनी बोलावून घेतले आणि त्यानंतर तब्बल दहा मिनिटांहून अधिक काळ ते चर्चा करत होते. दरम्यान, मिश्रा यांनी या आंदोलनाचा व्हिडीओ एक्स द्वारे सोशल मिडियावर प्रसारीत केला. या व्हिडीओबाबतही विपीन शर्मा यांनी काहीही नाराजी व्यक्त केल्याची माहितीही मिळत आहे. मात्र, जे काम मागील एक महिन्यांपासून झाले नव्हते ते केवळ एका आंदोलनाच्या धमकीने झाल्याने मिश्रा यांच्या चेहऱ्यावर काम झाल्याचे समाधान दिसत होते. मात्र, जे काम मागील एक महिन्यांपासून झाले नव्हते ते केवळ एका आंदोलनाच्या धमकीने झाले असावे असे मिश्रा यांच्या चेहऱ्यावरून दिसत होते. (BJP)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community