Shiv Sena UBT चे ‘गिरे तो भी टांग उपर’..; ‘मुख्यमंत्री’ पदाची मागणी रेटणे सुरू!

120
Shiv Sena UBT चे 'गिरे तो भी टांग उपर'..; ‘मुख्यमंत्री’ पदाची मागणी रेटणे सुरू!
  • खास प्रतिनिधी 

महाविकास आघाडीतील एक महत्त्वाचा राष्ट्रीय पक्ष काँग्रेस जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक लढवून पराभूत झाला, हे वास्तव न स्वीकारता, कलम ३७० हटवल्यानंतरही जम्मू-काश्मीरमध्ये भाजपा आणि नरेंद्र मोदी यांचा पराभव झाला, अशी ओरड शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) प्रवक्ते संजय राऊत यांनी सुरू केली.

जम्मू-काश्मीरमध्ये क्रांती

बुधवारी १० ऑक्टोबर २०२४ ला सकाळी संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाच्या जागा वाढूनही भाजपावर टीका केली. “देशाच्या आणि भाजपाच्या दृष्टीने जम्मू-कश्मीर महत्त्वाचे राज्य होते. कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रांती होईल, असे म्हणत भाजपाने हा निवडणुकीचा मुद्दा बनवला होता. मात्र याचा प्रचार करूनही येथे मोदी आणि त्यांच्या पक्षाचा पराभव झाला,” असे राऊत म्हणाले. (Shiv Sena UBT)

(हेही वाचा – राज्यात BJP ची सत्ता आणि महापालिकेत माजी पक्षनेत्याला करावे लागते आंदोलन)

हरियाणामध्येही भट्टी जमली असती

ते पुढे म्हणाले, “हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा ९० आमदारांचीच आहे. एका ठिकाणी इंडी आघाडी, तर दुसरीकडे भाजपा विजयी झाली. अर्थात हरियाणाचा पराभव दुर्दैवी आहे. जम्मू-काश्मीरमध्ये इंडी आघाडीचा विजय झाला. हरियाणामध्येही इंडी आघाडीची भट्टी जमली असती तर त्याचा निश्चितच परिणाम झाला असता,” असेही राऊत म्हणाले. (Shiv Sena UBT)

काही मिनिटांतच टूमणे पुन्हा सुरू

दरम्यान, काँग्रेसची पडती बाजू लक्षात घेऊन शिवसेना उबाठाने घटक पक्षांनी (काँग्रेस-राष्ट्रवादी) नाकारलेली, मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याची, जुनी मागणी पुन्हा पुढे रेटायला सुरुवात केली. मंगळवारी एकीकडे हरियाणाचा निकाल लागला, काँग्रेसचा पराभव झाला आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी काही मिनिटांतच ‘मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा’ असे टूमणे पुन्हा सुरू केले. (Shiv Sena UBT)

(हेही वाचा – विधानसभा जागा वाटपावर DCM Devendra Fadnavis यांचा आत्मविश्वास; महायुतीचा ‘पेपर’ जवळपास पूर्ण)

.. तर बदल झाला असता

तर संजय राऊत यांनी तीच री.. ओढत बुधवारी सकाळी ठाकरे यांच्या मागणीचा जबरदस्ती जम्मू-काश्मीरशी संबंध जोडत जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीमध्ये ओमर अब्दुल्ला हा चेहरा होता,” असे सांगत मागणी पुढे सरकवली. “लोकांनी ओमर अब्दुल्ला आणि इंडि आघाडीला मतदान केले. हरियाणामध्येही असा चेहरा समोर आला असता तर कदाचित अजून काही बदल झाला असता. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये लोकांना नेता हवा असतो. निवडणुका लढायच्या, जिंकायच्या आणि मग नेता ठरवायचा हे धोरण लोकांच्या पचनी पडत नाही. माझा नेता कोण, माझे नेतृत्व कोण करणार आहे, या राज्याला चेहरा कोणता हे स्पष्ट केला पाहिजे,” असेही राऊत म्हणाले. (Shiv Sena UBT)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.