- प्रतिनिधी
फसवणुकीतील रक्कम मिळवून देण्यासाठी १० टक्के रकमेची लाच मागणाऱ्या मुंबई आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक महेंद्र सावर्डेकर याला बुधवारी (०९ ऑक्टोबर) लाचेची (Bribery) रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
(हेही वाचा – राज्यात BJP ची सत्ता आणि महापालिकेत माजी पक्षनेत्याला करावे लागते आंदोलन)
पोलिस निरीक्षक महेंद्र सावर्डेकर हा मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या एमपीआयडी विभागात कार्यरत होता. यलो गेट पोलीस ठाण्याच्या दुसऱ्या मजल्यावर आर्थिक गुन्हे शाखा एमपीआयडी विभागाचे कार्यालय आहे. तामिळनाडू येथील तक्रारदाराने ब्लिस कन्सल्टन्सी कंपनीत ४९ लाख ४४ हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. तक्रारदाराची फसवणूक झाल्यामुळे त्यांनी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली होती. (Bribery)
(हेही वाचा – Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाची गुरुवारी बैठक)
या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या एमपीआयडी विभागाकडे देण्यात आला होता. या गुन्ह्याचे तपास अधिकारी महेंद्र सावर्डेकर हे होते. त्यांनी गुंतवणुकीच्या १० टक्के म्हणजेच ४ लाख ९० हजार रुपये रकमेच्या लाचेची (Bribery) मागणी सावर्डेकर यांच्याकडे केली होती. दरम्यान तक्रारदाराने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. बुधवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यलो गेट येथे लावलेल्या सापळ्यात पोलीस निरीक्षक सावर्डेकर याला २ लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community