प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata Death) यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी ( 7ऑक्टोबर) नियमित तपासणीसाठी रतन टाटा (Ratan Tata Death) रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर (Ratan Tata Death) त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज (गुरुवार १० ऑक्टोबर) एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी घोषणा केली आहे. रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत.
(हेही वाचा-Ratan Tata Death : उद्योगपती रतन टाटा यांचे निधन; वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)
रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. (Ratan Tata Death)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community