Ratan Tata Death : ‘भारताने एक आदर्श आणि प्रतिभावान मुलगा गमावला’ रतन टाटा यांच्या निधनानंतर नितीन गडकरींनी वाहिली श्रद्धाजंली  

75
Ratan Tata Death : भारतीय उद्योजक जगताचा विश्वासार्ह, आश्वासक चेहरा हरपला - अजित पवार
Ratan Tata Death : भारतीय उद्योजक जगताचा विश्वासार्ह, आश्वासक चेहरा हरपला - अजित पवार

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata Death) यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात (Breach Candy Hospital) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी (७ ऑक्टोबर) नियमित तपासणीसाठी रतन टाटा (Ratan Tata Death) रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटांच्या (Ratan Tata) निधनाचं वृत्त प्रसिद्ध होताच अनेक नेत्यांनी व कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. याशिवाय रतन टाटा यांची निधनांची बातमी समजताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून श्रद्धाजंली वाहिली.  (Ratan Tata Death)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘एक्स’ या मायक्रोब्लॉगिंग या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्ट मध्ये यांनी असं म्हटलं की “देशाचे महान सुपुत्र रतन टाटा यांच्या निधनाची बातमी ऐकून मला धक्का बसला आहे. रतन टाटा यांचे तीन दशकांहून अधिक काळापासून अतिशय जवळचे कौटुंबिक संबंध आहेत. इतक्या मोठ्या व्यक्तीची साधेपणा, त्याची उत्स्फूर्तता, माझ्यातील अगदी लहान व्यक्तीचाही आदर करणे, हे सर्व गुण मी अगदी जवळून पाहिले आणि अनुभवले आहेत. मी माझ्या आयुष्यात त्यांच्याकडून खूप काही शिकलो आहे. देशातील सर्वात मोठा व्यापारी असल्याने, देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यात आणि रोजगार निर्मितीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. ते एक महान देशभक्त तसेच तत्त्वनिष्ठ व्यक्ती होते. ते एका मोठ्या उद्योगपतीपेक्षा अधिक संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता होते. त्यांच्या निधनामुळे भारताने एक आदर्श आणि प्रतिभावान मुलगा गमावला आहे. हा देश रतन टाटांना कधीही विसरू शकत नाही. ईश्वर दिवंगत आत्म्याला शांती देवो. शांती. (Ratan Tata Death)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.