ऐन विधानसभा निवडणुकीआधी उबाठा गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संजय राऊत यांच्याविरोधात मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. खोटी अफवा पसरवल्याबद्दल संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. लाडकी बहिण योजना बंद पडल्याचा दावा राऊतांनी (Sanjay Raut) केला होता. त्यानंतर भोपाळमध्ये भाजप महिला मोर्चाने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर आता संजय राऊत विरोधात गुन्हा झाला आहे.
संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी ‘लाडकी बहिण’ योजनेवरून सरकारवर टीका केली. मध्यप्रदेशमध्ये ही योजना बंद पडल्याचा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. त्यानंतर राऊतांच्या या विधानावर आक्षेप घेण्यात आला. भाजपा महिला मोर्चाने याबाबत तक्रार केली आहे.
तक्रारीत काय आहे?
भोपाळमधील भाजप महिला मोर्चाच्या नेत्या सुभाषा चौहान यांनी संजय राऊतांच्या विधानावर आक्षेप घेतला. सुभाषा चौहान यांच्या तक्रारीनंतर संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संजय राऊत यांनी समाजात खोटी माहिती पसरवली. जनतेची दिशाभूल केली आहे. त्यामुळे जनतेमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे, असं सुभाषा चौहान यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हणण्यात आलं आहे. (Sanjay Raut)
संजय राऊत काय म्हणाले?
गुन्हा दाखल झाल्यानंतर राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊतांनी प्रतिसवाल केला आहे. “माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. मी काय चुकीचे बोललो आहे? जेव्हा आम्हाला कोर्टात बोलतील. तेव्हा आम्ही सांगू. उत्तर प्रदेशमध्ये खरोखर ‘लाडली बहन’ची काय स्थिती आहे ती त्यांनी जाहीर केली पाहिजे. महाराष्ट्रात लाडकी बहिणीच्या नावाखाली फसवा फसवी सुरू आहे. मतांसाठी लाडकी बहीण योजना ही मत विकत घेण्यासाठी योजना आहे.” असं संजय राऊत म्हणाले. (Sanjay Raut)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community