Women’s T20 World Cup : श्रीलंकन महिलांचा ८२ धावांनी पराभव करत भारताने राखलं टी-२० विश्वचषकातील आव्हान 

Women's T20 World Cup : कर्णधार हरमनप्रीत कौरने ५२ धावा करत विजयात मोठा हातभार उचलला 

70
Women's T20 World Cup : श्रीलंकन महिलांचा ८२ धावांनी पराभव करत भारताने राखलं टी-२० विश्वचषकातील आव्हान 
Women's T20 World Cup : श्रीलंकन महिलांचा ८२ धावांनी पराभव करत भारताने राखलं टी-२० विश्वचषकातील आव्हान 
  • ऋजुता लुकतुके 

महिला टी-२० विश्वचषकात भारतीय महिलांनी श्रीलंकन महिलांचा ७२ धावांनी पराभव करत स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने मोठा विजय मिळवला आहे. अगदी नाणेफेक जिंकण्यापासून हरमनप्रीतच्या (Harmanpreet Kaur) मनासारखं सगळं घडत गेलं. शफाली वर्मा आणि स्मृती मंढाणाने (Smriti Mandhana) सुरुवातही झोकात केली. दोघींनी १३ व्या षटकातच ९८ धावांची सलामी करून दिली. मंढाणा ५० धावांवर बाद झाल्यानंतर खेळाची सूत्र हरमनप्रीतने हातात घेतली. महिलांच्या टी-२० क्रिकेटमधील एक सर्वोत्तम खेळी हरमनप्रीतने सादर केली. २७ चेंडूंत नाबाद ५२ धावा करताना तिने सर्वात जलद अर्धशतकही ठोकलं. यात तिने १ षटकार आणि ८ चौकार ठोकले. (Women’s T20 World Cup)

(हेही वाचा- MHADA Pune Lottery : तब्बल ६२९४ सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाईन सोडत गुरुवारपासून…)

हरमनप्रीतने (Harmanpreet Kaur) एक बाजू लावून धरत भारतीय संघासाठी धावा वाढवल्या. शफाली वर्माने (Shafali Verma) ४३ तर जेमिमा रोड्रिगेजने (Jemimah Rodrigues) १३ धावा केल्या. भारतीय महिलांनी निर्घारित २० षटकांत ३ बाद १७२ धावा केल्या. भारतीय फलंदाजांना रोखण्यासाठी श्रीलंकेनं सात गोलंदाज वापरले. पण, एकीचाही निभाव लागला नाही. इनोशी प्रियदर्शनी या एकमेव गोलंदाजाने ५.५० धावगतीने धावा दिल्या. बाकी सगळ्यांना हरमनप्रीतने कुटलं. (Women’s T20 World Cup)

 हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय फलंदाजांनी निम्मं काम केलं होतं. उरलेली कसर गोलंदाजांनी भरून काढली. सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर रेणुका सिंगने (Renuka Singh) चामरा गुणरत्नेला शून्यावर बाद केलं. तिथून पुढील ३ षटकांत श्रीलंकन संघाची अवस्था ३ बाद ६ अशी झाली. रेणुका सिंगने १६ धावांत २ गडी बाद केले. सुरुवातीच्या पडझडीनंतर कविशा दिलहारी (२०) आणि संजीवनी (२१) यांनी थोडाफार प्रतिकार केला. या दोघींनंतर पुन्हा एकदा फलंदाजांची तंबूत रांग सुरू झाली. फक्त तीन फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. (Women’s T20 World Cup)

(हेही वाचा- Ratan Tata Death : रतन टाटांबद्दलच्या ‘या’ १० रंजक गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?)

भारताकडून अरुंधति रेड्डीने (Arundhati Reddy) १९ धावांत ३ तर आशा शोभनानेही १९ धावांत ३ बळी मिळवले. २७ चेंडूंत वेगवान अर्धशतक ठोकणाऱ्या हरमनप्रीतला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. भारतीय महिलांनी हा सलग दुसरा विजय मिळवला आहे. पण, तोपर्यंत ऑस्ट्रेलियानेही न्यूझीलंड महिलांचा ५० धावांनी मोठा पराभव केला आहे. त्यामुळे उर्वरित सामन्यात आता भारतीय महिलांना दक्षिण आफ्रिकेचा मोठ्या फरकाने पराभव करावा लागणार आहे. (Women’s T20 World Cup)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.