Torrent Pharmaceuticals : १३ वर्षांच्या नोकरीनंतर सुरू केली फार्मा कंपनी आणि २५ अब्ज अमेरिकन डॉलरचं साम्राज्य 

Torrent Pharmaceuticals : सध्या या समुहाची मालकी समीर आणि सुधीर मेहता यांच्याकडे आहे 

128
Torrent Pharmaceuticals : १३ वर्षांच्या नोकरीनंतर सुरू केली फार्मा कंपनी आणि २५ अब्ज अमेरिकन डॉलरचं साम्राज्य 
Torrent Pharmaceuticals : १३ वर्षांच्या नोकरीनंतर सुरू केली फार्मा कंपनी आणि २५ अब्ज अमेरिकन डॉलरचं साम्राज्य 
  • ऋजुता लुकतुके 

अभिनेते आणि कलाकारांसाठी मुंबई ही स्वप्ननगरी आहे. तशीच ती उद्योजकांसाठीही आहे. अगदी ब्रिटिशांच्या काळापासून मुंबई ही देशाची औद्योगिक राजधानी आहे. त्यामुळे काहीजण पोटा पाण्यासाठी तर काहीजण स्वप्नांचा पाठलाग करत या नगरीत येतात. तसंच गुजरातच्या पालमपूर जिल्ह्यातील महमदपूरमधून एक तरुण स्वातंत्र्यपूर्व काळातच मुंबईत आला. वसती गृहात राहात, विल्सन कॉलेजमधून त्याने पदवी परीक्षा दिली. १९४४ मध्ये हा मुलगा सरकारी नोकरीत चिकटला. मराठी मध्यमवर्गीयाला वाटेल की, झाली आयुष्याची इति कर्तव्यता! पण, हा तरुण गुजरातचा होता. त्याने एकाच वर्षात सरकारी नोकरी सोडली. सांडोझ फार्मा कंपनीत मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून नोकरी पत्करली. १४ वर्ष इमाने इतबारे ती नोकरी केली. (Torrent Pharmaceuticals)

(हेही वाचा- Ratan Tata Death : टाटांच्या अंत्यसंस्काराला अमित शाह राहणार उपस्थित )

१९५८ मध्ये पत्नी आणि ४ मुलं पदरात असताना अचानक निर्णय घेतला नोकरी सोडून स्वत:चा उद्योग सुरू करण्याचा. फार्मा उद्योगाचा थोडाफार अनुभव असल्याने १९५९ मध्ये त्याने ट्रिनिटी लॅबोरेटरीज् नावाने फार्मा कंपनी सुरू केली. सुरुवातीला भारतात तयार होणाऱ्या औषधांचं विपणन हेच कंपनीचं मुख्य उद्‌दिष्ट होतं. आणि इतरांपेक्षा कमी दर ठेवत मध्यमवयीन माणसाने आपला धंद्यात हळू हळू जम बसवला. उत्तमभाई नाथालाल मेहता असं या तरुणाचं नाव होतं. (Torrent Pharmaceuticals)

म्हणता म्हणता कंपनीने आपल्या औषधांची संख्या वाढवत नेली. २५,००० रुपयांच्या भांडवलावर सुरू झालेला हा उद्योग आता स्वत:ची औषधं बनवण्याची आणि विकसित करण्याची स्वप्न पाहू लागला. मनोविकारांवरील औषधाने सुरू झालेला प्रवास कर्करोग, विषाणूजन्य आजार अशा विविध आजारांवरील औषधांपर्यंत पोहोचला. गुजरातेत दहेज इथं कंपनीचा उत्पादन प्रकल्प सुरू झाला. ट्रिनिटी हे सुरुवातीचं नाव बदलून ते टोरंट फार्मा झालं. १९७१ मध्ये टोरन्ट समुहात टोरन्ट पॉवरचाही समावेश झाला. उत्तमभाई खऱ्या अर्थाने उद्योजक झाले. (Torrent Pharmaceuticals)

(हेही वाचा- Sanjay Raut : लाडक्या बहिंणींना बोलण संजय राऊतांना पडलं महागात; गुन्हा दाखल)

२० च्या वर देशांमध्ये टोरन्ट फार्माची उत्पादनं जातात. मुलं समीर आणि सुधीर यांनी उद्योग क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर समुहाने टोरन्ट केबल्स आणि टोरन्ट गॅस या क्षेत्रातही विस्तार केला आहे. २०२४ मध्ये कंपनीचं भाग भांडवल २५ अब्ज अमेरिकन डॉलरवर गेलं आहे. (Torrent Pharmaceuticals)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.