Reliance Industries : देशाच्या व्यापारी निर्यातीतील ७ टक्के वाटा उचलणारी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी

Reliance Industries : रिलायन्स ही भारतातील सगळ्यात मोठी खाजगी कंपनी आहे 

132
Reliance Industries : देशाच्या व्यापारी निर्यातीतील ७ टक्के वाटा उचलणारी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी
Reliance Industries : देशाच्या व्यापारी निर्यातीतील ७ टक्के वाटा उचलणारी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी
  • ऋजुता लुकतुके 

एखाद्या भारतीयाला रिलायन्स कंपनीची आणि तिचे मालक अंबानी कुटुंबाची वेगळी ओळख करून द्यायला नको. वस्त्रोद्योग, पेट्रोकेमिकल्स, नैसर्गिक वायू, रिटेल, दूरसंचार, माहिती व मनोरंजन अशा सगळ्या क्षेत्रातील ही एक आघाडीची कंपनी आहे. भांग भांडवल तसंच महसूल अशा दोन्ही निकषांवर ही देशातील सगळ्यात मोठी खाजगी कंपनी आहे. तर जगभरातील ती शंभरावी मोठी कंपनी आहे. देशाच्या एकूण व्यापारी निर्यातीतील ७ टक्के वाटा हा एकट्या रिलायन्सचा आहे. (Reliance Industries)

१९५८ मध्ये धीरूभाई अंबानी यांनी आपल्या मित्राबरोबर रिलायन्स ट्रेडिंग कंपनीची स्थापना केली. कंपनीचा प्राथमिक उद्देश मसाल्याचे पदार्थ आणि तयार कपड्यांचा व्यापार हेच होतं. पण, धीरुभाईंची स्वप्नं मोठी होती. त्यांना पॉलिएस्टर कापडाचं उत्पादनच भारतात सुरू करायचं होतं. पण, नियोजनात त्यांचं त्यांच्या भागिदारांशी भांडण झालं. मित्र वेगळा झाला. पण, धीरुभाईंनी आपली योजना तडीस नेलीच. १९६६ मध्ये रिलायन्स टेक्सटाईल लिमिटेड कंपनीची  स्थापना झाली. नरोदा इथं कंपनीची पहिली मिलही सुरू झाली. (Reliance Industries)

(हेही वाचा- Torrent Pharmaceuticals : १३ वर्षांच्या नोकरीनंतर सुरू केली फार्मा कंपनी आणि २५ अब्ज अमेरिकन डॉलरचं साम्राज्य )

या कंपनीच्या विस्तारासाठी धीरूभाई अंबानींना पैशाची गरज होती. त्यासाठी त्यांनी बँकांचे दरवाजे ठोठावले. पण, पूर्वानुभव नसल्यामुळे आणि कागदपत्रांची पूर्तता होत नसल्यामुळे बँकांनी धीरुभाईंना कर्ज नाकारलं. पण, त्यांनी हार मानली नाही. १९७७ मध्ये ते चक्क शेअर बाजारातील गुंतवणूकदारांकडे गेले. त्यांनी १९७७ साली रिलायन्सचा आयपीओ बाजारात आणला. तेव्हापासून ही कंपनी आणि शेअर गुंतवणूकदारांचं भारतात नातं तयार झालं. रिलायन्स समुहाचं तेव्हापासूनच शेअर बाजाराला मोठं योगदान आहे. (Reliance Industries)

‘विमल’ हा कंपनीचा टेक्सटाईल ब्रँड तेव्हापासून देशातील एक प्रमुख ब्रँड आहे. वाडिया समुहाच्या बाँबे डाईंग ब्रँडशी तेव्हा झालेली स्पर्धा गाजली होती. १९८५ मध्ये रिलायन्स टेक्सटाईल हे नाव बदलून रिलायन्स इंडस्ट्रीज हे करण्यात आलं. कारण, तोपर्यंत धीरूभाईंनी पेट्रोकेमिकल्स उद्योगाची प्राथमिक तयारी सुरू केलेली होती. हजिरा इथं पहिला प्रकल्प १९९१ मध्ये उभा राहिला. २००२ मध्ये रिलायन्स समुहाला कृष्णा – गोदावरी खोऱ्यात मोठा वायूसाठा सापडला. तिथपासून समुहाने मागे वळून पाहिलेलं नाही. कंपनीला १२० कोटी बॅरल्स इतकं कच्चं तेल सापडलं होतं. देशातील खाजगी कंपनीला सापडलेला हा सगळ्यात मोठा तेल साठा होता. (Reliance Industries)

(हेही वाचा- Sanjay Raut : लाडक्या बहिंणींना बोलण संजय राऊतांना पडलं महागात; गुन्हा दाखल)

रिलायन्स समुहाचं कार्यक्षेत्र जगभर आहे. कंपनीत २.५ लाखांहून जास्त कर्मचारी कामाला आहेत. कंपनीचं भाग भांडवल १८.६० ट्रिलिटन रुपयांच्या घरात आहे. तर कंपनीचा महसूल १२० अब्ज अमेरिकन डॉलरचा आहे. (Reliance Industries)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.