Ratan Tata Death : रतन टाटांच्या अंत्यविधी आणि अंत्ययात्रेच्या नियोजनासाठी बीएमसी, टाटा ट्रस्ट यांच्याकडून ‘असं’ आहे नियोजन

221
Ratan Tata No More : टाटा समूहात रतन टाटा यांचे उत्तराधिकारी कोण?

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata Death) यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी ( 7ऑक्टोबर) नियमित तपासणीसाठी रतन टाटा (Ratan Tata Death) रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटांच्या निधनाचं वृत्त प्रसिद्ध होताच अनेक नेत्यांनी व कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

वॉटरप्रुफ मंडपही पालिकेकडून उभारला

मुंबई महापालिका आणि टाटा ट्रस्ट यांच्याकडून रतन टाटा (Ratan Tata Death) यांच्या अंत्ययात्रा आणि अंत्यविधींचे नियोजन केलं जात आहे. माता रमाबाई आंबेडकर वरळी स्मशानभूमीत रतन टाटांवर संध्या ५ वाजता अंत्यसंस्कार केले जातील. तत्पूर्वी महापालिकेकडून अंत्यसंस्काराच्या ठिकाणी रतन टाटांना निरोप देण्यासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. स्मशानभूमीतील- कम्युनिटी हॉल येथे सामुहिक प्रार्थना होईल. मुंबईत पावसाची शक्यता असल्यानं वॉटरप्रुफ मंडपही पालिकेकडून उभारला जाणार आहे. रतन टाटांना अखेरचा निरोप देण्यासाठी होणारी गर्दी आणि व्हिआयपी लक्षात घेता पोलिसांकडूनही चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

कुलाबामधील त्यांच्या निवासस्थानी रतन टाटा (Ratan Tata) यांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर सकाळी 10.30-11 वाजताच्या सुमारास रतन टाटा यांचं पार्थिव एका गाडीमधून मुंबईतील एनसीपीए येथे अंतिम दर्शनासाठी नेण्यात आलं. यादरम्यान रतन टाटा यांचा 31 वर्षीय जिवलग मित्र आणि स्वीय सहाय्यक शांतनू नायडू (Shantanu Naidu) देखील होता. रतन टाटा यांचं पार्थिव ठेवलेल्या गाडीच्या पुढे शांतून बाईकद्वारे हळूहळू पुढे जात रस्ता मोकळा करत होता. शांतनूचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच हा व्हिडीओ पाहून सर्वच भावूक झाल्याचे दिसून येत आहे. (Ratan Tata Death)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.