दादर हे मुंबई उपनागरातलं दाट लोकवस्ती असलेलं आणि खरेदीचं ठिकाण आहे. दादर स्थानक हे स्थानिक आणि राष्ट्रीय कनेक्टिव्हिटी असलेलं एक प्रमुख रेल्वे स्थानक आणि बस सेवा केंद्र देखील आहे. हे मुंबईमधलं पहिलं नियोजित क्षेत्र आहे. दादर हे मुंबई शहराच्या मराठमोळ्या संस्कृतीचं केंद्र आहे. (dadar railway station)
दादरचा इतिहास
- दादरचं मूळ
१६व्या शतकामध्ये मुंबईच्या सात बेटांपैकी एक असलेल्या माहीम बेटावर हा परिसर वसलेला आहे. हा परिसर त्या काळी लोअर माहीम म्हणून ओळखला जात होता. पोर्तुगीजांच्या काळात हा परिसर सर्वात महत्त्वाचा होता. पोर्तुगीज फ्रान्सिस्कन्स यांनी १५९६ साली येथे Nossa Senhora de Salvação नावाचं एक चर्च बांधलं. ते चर्च आज पोर्तुगीज चर्च म्हणून ओळखलं जातं.
- १९वं आणि २०वं शतक
१८९९ ते १९०० सालची दादर-माटुंगा-वडाळा-सायन योजना ही मुंबईतली पहिली नियोजित योजना होती. त्या काळी बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्टने १८९० सालच्या प्लेगच्या साथीनंतर शहराच्या मध्यभागी गर्दी कमी व्हावी या हेतूने ही योजना आखली होती. सर्वेक्षण योजनेनुसार दादर-माटुंगा येथे ६०,००० आणि सायन-माटुंगा येथे जवळजवळ तितक्याच संख्येने लोक राहायचे. शिवडी-वडाळ्यातील जवळजवळ ८५,००० लोकांना सामावून घेतलं गेलं होतं.
सिटी इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट म्हणजेच CIT या योजनेंतर्गत दादरला स्थलांतरित झालेल्या संस्थांपैकी एक म्हणजे व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट आहे. ही इन्स्टिट्यूट आता वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट म्हणून ओळखली जाते. दुसरी म्हणजे किंग जॉर्ज शाळा आहे. ही शाळा आता IES ‘राजा शिवाजी विद्यालय’ म्हणून ओळखली जाते. (dadar railway station)
१९३७ साली रामनारायण रुईया कॉलेज आणि १९३९ साली रामनिरंजन पोदार कॉलेजची स्थापना करण्यात आली. त्यामुळे दादरच्या निवासी भागातून अधिक वैविध्यपूर्ण आसपासच्या परिसरात होऊ लागलं. हे दोन्ही कॉलेजेस एसपी मंडळी चालवतात. तसंच दादर येथे असलेलं डॉ. अँटोनियो डी-सिल्वा हायस्कूल हे १८५१ साली स्थापन करण्यात आलं. ही शाळा मुंबईतल्या सर्वांत जुन्या शाळांपैकी एक आहे.
मुंबई इथल्या कापूस गिरण्यांच्या काळात दादर येथे बॉम्बे डाईंग म्हणजेच स्प्रिंग मिल्स, गोल्ड मोहूर मिल्स, कोहिनूर मिल्स, रुबी मिल्स आणि टाटा मिल्स यासारख्या काही महत्त्वाच्या गिरण्या होत्या. त्यानंतर मुंबई गिरण्यांच्या पुनर्विकासाच्या दरम्यान यांपैकी काही गिरण्यांचा पुनर्विकास करण्यात आला तर काही गिरण्या बंद पडल्या. (dadar railway station)
(हेही वाचा – Ratan Tata Death : “संकटांवर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात…”, रतन टाटा यांच्या निधनानंतर शरद पवारांकडून श्रद्धांजली)
पुढे १९३७ सालपर्यंत शिवाजी पार्क आणि आसपासचा परिसर विकसित झाला. भारताच्या राजकीय इतिहासात शिवाजी पार्कला महत्त्वाचं स्थान आहे. मुंबईतला राजकीय इतिहासही याच उद्यानात उलगडला. दादरचं भाग्य असं की इथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वा. सावरकर राहायचे. आत ऐथे चैत्यभूमी आणि सावरकर स्मारक आहे, जे या दोन महापुरुषांची आठवण करुन देतात.
तसंच शारदाश्रम सोसायटी आणि त्यानंतर १९४८ ते १९५० सालादरम्यान बांधलेली शाळा ही दादरची सर्वात मोठी ओळख आहे. शारदाश्रम सोसायटी ही आशियातली पहिली नोंदणीकृत सोसायटी आणि मुंबईतली पहिली सोसायटी आहे.
१९९३ सालच्या बॉम्बस्फोटादरम्यान डॉ. जे. के. मंडोत यांच्या दादरमध्ये असलेल्या नायगाव क्रॉस रोड वरच्या दवाखान्याबाहेर एक संशयास्पद बजाज चेतक स्कुटर पार्क केलेली होती. त्याची माहिती डॉक्टरांनी लगेचच पोलिसांना दिली. त्यावेळी लगेचच बॉम्ब स्क्वॉडने तिथे येऊन ती आरडीएक्सने भरलेल्या स्कुटरमधला बॉम्ब निकामी केला होता. (dadar railway station)
(हेही वाचा – Reliance Industries : देशाच्या व्यापारी निर्यातीतील ७ टक्के वाटा उचलणारी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी)
- २१वं शतक
आजच्या काळात दादर स्थानकाचं महत्त्व रेल्वे मार्गांमुळे वाढलं आहे. जुन्या चाळी नवीन उंच इमारतींना वाढायला मार्ग देत आहेत. त्यामुळे आजूबाजूचं क्षितिज बदलत आहे. इथलं खोदादाद मंडळ आणि त्याच्या आजूबाजूच्या इमारती हे ग्रेड IIB च्या हेरिटेज साइट आहेत.
दादरची संस्कृती
दादर हे मूळ मराठी भाषिक स्थानिक लोकांसाठी तसंच उर्वरित महाराष्ट्रातल्या लोकांसाठी फार पूर्वीपासून सांस्कृतिक केंद्र बनून राहिलेलं आहे. हे ठिकाण कोकण किनाऱ्यालगत असल्याने मुंबईच्या इतर भागांप्रमाणेच या प्रदेशाची मूळ भाषा मराठीच आहे.
- सिनेमा
दादा साहेब फाळके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ इथल्या रस्त्याला त्यांचं नाव देण्यात आलं आहे. यांनी त्यांचा पहिला चित्रपट “राजा हरिश्चंद्र” हा दादर पूर्व येथील त्यांच्या एका मित्राच्या घरी मथुरा भवन येथे शूट केला होता. याव्यतिरिक्त रणजीत स्टुडिओ आणि रूपतारा स्टुडिओ यांसारखे इतर अनेक प्रमुख चित्रपट स्टुडिओ या रस्त्यावर बांधले गेले.
नाटक पाहणारा एक सक्रिय रसिक प्रेक्षक समुह देखील येथे आहे. इथे असलेलं शिवाजी मंदिर हे नाट्यगृह मुंबईतल्या काही प्रमुख नाट्यगृहांपैकी एक आहे. विजय तेंडुलकर, विजया मेहता, महेश एलकुंचवार, डॉ. श्रीराम लागू आणि नाना पाटेकर यांसारख्या कलाकारांना येथेच प्रेक्षक लाभले. (dadar railway station)
दादरमध्ये चित्रा सिनेमा, आयनॉक्स नक्षत्र आणि हिंदमाता सिनेमा यांसारखे चित्रपटगृह आहेत. १९९३ सालच्या बॉम्बस्फोट आणि दंगली दरम्यान दादर पश्चिम इथलं एक प्रमुख चित्रपट थिएटर प्लाझा सिनेमाचं खूप नुकसान झालं होतं. ते थिएटर आता पुन्हा सुरू झालेलं आहे. प्रामुख्याने मराठी चित्रपट दाखवणाऱ्या मुंबईतील थिएटरपैकी एक ते आहे.
(हेही वाचा – Ratan Tata Death : “रतन टाटांच्या निधनामुळे अमूल्य रत्न गमावले”, सरसंघचालक मोहन भागवत यांनी वाहिली श्रद्धांजली)
- रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थ
दादर स्टेशनच्या बाहेर १९७१ सालापासून अशोक वैद्य यांनी वड्याबरोबर भाकरीसाठी पोर्तुगीज शब्द वापरून वडापावचा शोध लावला होता. वडापाव व्यतिरिक्त दादर हे बटाटा वडा, थालीपीठ, साबुदाणा वडा, मिसळ पाव, उसळ पाव, पुरी भाजी, पिठलं भाकरी, पियुष आणि लस्सी यांसारख्या पारंपारिक खाद्यपदार्थांसाठी देखील लोकप्रिय आहे. दादरमध्ये मराठी खाद्यपदार्थ स्पेशालिटी असलेले प्रकाश हॉटेल, आस्वाद हॉटेल, जिप्सी, सिंधुदुर्ग हॉटेल, गोमंतक हॉटेल, पणशीकर अशी अनेक रेस्टॉरंट्स आहेत. तसंच उडुपी, पंजाबी, उत्तर भारतीय, चायनीज, थाई आणि इतर बऱ्याच खाद्यपदार्थांची वर्दळ असणारे रेस्टॉरंट्स दादरमध्ये दिसतात.
दादर येथील उद्याने आणि मैदाने
दादर पश्चिम इथलं शिवाजी पार्क हे मुंबईतलं सर्वात मोठ्या मैदानांपैकी एक आहे. हे मैदान क्रीडा उपक्रमांचं केंद्र आहे, विशेषतः क्रिकेटसाठी. अशोक मांकड, विनू मांकड, विजय हजारे, सलीम दुराणी, अजित वाडेकर, सुनील गावस्कर, संदिप पाटील, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर आणि संजय मांजरेकर यांसारख्या अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी या शिवाजी पार्कच्या मैदानावरच प्रशिक्षण घेतलं आहे.
११२,९३७ चौरसमीटर म्हणजेच २७.९०७ एकर मध्ये पसरलेल्या या मैदानात समर्थ व्यायाम मंदिर नावाची व्यायामशाळा, शिवाजी पार्क नागरिक संघ, शिवाजी पार्क जिमखाना नावाचा क्लब, माई मंगेशकर बालोद्यान, आजी-आजोबा उद्यान, स्काउटचे मंडप, बंगाली मंदिर, गणेश मंदिर, काली मंदिर आणि लायब्ररी असलेला क्लब आहे. याव्यतिरिक्त मैदानाच्या सभोवताली फुटपाथवर सावलीसाठी पुष्कळ झाडं आणि बसण्यासाठी दगडी कट्टा आहे. हे शिवाजी पार्क जवळच्या अनेक रहिवाशांसाठी संध्याकाळी फिरण्यासाठी लोकप्रिय ठिकाण आहे. (dadar railway station)
(हेही वाचा – Ratan Tata Death : रतन टाटांच्या अंत्यविधी आणि अंत्ययात्रेच्या नियोजनासाठी बीएमसी, टाटा ट्रस्ट यांच्याकडून ‘असं’ आहे नियोजन)
दादर चौपाटी येथे समुद्र, वाळू आणि मुंबई चाट कॉर्नर्स आहेत. हे सुद्धा एक लोकप्रिय ठिकाण आहे. दादारमधल्या इतर काही उद्यानांमध्ये पारसी कॉलनीशेजारचं फाइव्ह गार्डन, वीर कोतवाल उद्यान, लखमसी नप्पू रस्त्यालगत असलेलं वैद्य उद्यान यांचाही समावेश आहे.
दादारमधली पूजास्थळे
दादरमध्ये पूर्वेला रेल्वे स्थानाकासमोरच स्वामीनारायण मंदिर आहे. तसेच रुस्तम फोरमिना अग्यारी पारशी कॉलनी, एनसी नरीएलवाला दादर आगरी हे नायगाम क्रॉस रोड येथे आहे, शिवाजी पार्क येथे काली मंदिर, गणेश मंदिर यांसारखी कित्येक धार्मिक स्थळं आहेत. दादर जवळ प्रभादेवी येथे असलेलं सिद्धिविनायक मंदिर, सैतान चुकी इथे जाखादेवी मंदिर, आंबेडकर रोडवर असलेलं श्री गुरु सिंह सभा बॉम्बे, श्री कृष्ण मंदिर सभागृह, श्री महावीर दिगंबर जैन मंदिर, पूर्वेला रेल्वे स्थानकाच्या बाहेर हनुमान मंदिर अशी कित्येक प्रार्थना स्थळं आहेत. (dadar railway station)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community