रतन टाटांबद्दलच्या या 10 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?
रतन टाटा हे जमशेटजी टाटा यांचे पणतू. त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 साली झाला होता. नवल आणि सुनी टाटा हे त्यांचे आई वडील होते.
1948 साली आईवडील विभक्त झाल्यानंतर रतन टाटा यांचे संगोपन त्यांची आजी नवाजबाई टाटा यांनी केले होते.
रतन टाटा हे अविवाहीत राहिले. चार वेळा ते बोहल्यापर्यंत पोहोचले होते, मात्र त्यांचे लग्न होऊ शकले नाही.
'लॉस एंजेलिसमध्ये काम करत असताना आपण एका तरुणीच्या प्रेमात पडलो होतो' असे त्यांनी सांगितले होते. मात्र 1962 सालच्या भारत चीन युद्धामुळे तरुणीच्या आईवडिलांनी तिला भारतात पाठवण्यास नकार दिला होता.
1961 साली त्यांनी कौटुंबिक व्यवसायात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला होता. टाटा स्टीलचे दैनंदीन कामकाज पाहण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती.
भारतीय अर्थव्यवस्थेने उदार धोरण स्वीकारले आणि रतन टाटा यांनी भविष्यातील संधी तसेच आव्हाने ओळखून टाटा समूहाची पुनर्बांधणी करण्याचे ठरवले.
त्यांच्या कार्यकाळात रतन टाटा यांनी, 'टाटा टी', टाटा मोटर्स, जॅग्वार लँड रोव्हर आणि टाटा स्टील या कोरस कंपनी आपल्या ताब्यात घेतल्या.
जगातील सगळ्यात स्वस्त कार बनवून दाखवेन असा निर्धार रतन टाटा यांनी केला होता.
अवघ्या 1 लाखात मिळणारी टाटा नॅनो बाजारात आणून त्यांनी आपला निर्धार पूर्ण केला होता.