Bhagoji Keer, Nana Shankarsheth यांच्या स्मारकांच्या भूमिपूजनाचा मुहूर्तच जुळून येईना

1929
Bhagoji Keer, Nana Shankarsheth यांच्या स्मारकांच्या भूमिपूजनाचा मुहूर्तच जुळून येईना
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

भागोजी किर आणि नाना शंकर शेट यांच्या स्मारकांच्या भूमिपूजनाचा मुहूर्तच जुळून येईना. नाना शंकर शेट यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा पहिला प्रयत्न ३१ जुलै २०१५ रोजी झाला होता, परंतु त्याच वेळी माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचे निधन झाल्याने तीन दिवसांचा दुखवटा पाळल्याने याचे भूमिपूजन होऊ शकले नाही, त्यानंतर याचे भूमिपूजन आता ७ ऑक्टोबर राजी नाना शंकर शेट यांच्यासह भागोजी किर यांच्या स्मारकाचे भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. परंतु हे भूमिपूजन आयत्या वेळी रद्द करून गुरुवारी १० ऑक्टोबर रोजी दुपारी आयोजित केला होता, परंतु उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाल्यानेही हे भूमिपूजन पुढे ढकले असल्याने या दोन्ही बड्या समाजपुरुषांच्या स्मारकांच्या भूमिपूजनाचा मुहूर्तच जुळून येत नसल्याचे दिसून येत आहे. (Bhagoji Keer, Nana Shankarsheth)

मुंबईतील मराठी भाषा भवन, नाना शंकर शेट, भागोजी किर यांच्या स्मारकांच्या भूमिपूजनासह विविध विकासकामांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमिपूजन हे गुरुवारी दुपारी बारा वाजता होणार होते. यापूर्वी हा कार्यक्रम सोमवारी ७ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात आला होता. परंतु हा कार्यक्रम शेवटच्या क्षणाला रद्द करण्यात आला. सोमवारच्या कार्यक्रमात मराठी भाषा भवनाचा समावेश नव्हता, परंतु गुरुवारच्या कार्यक्रमात मराठी भाषा भवनाचा समावेश करत यापूर्वीच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, चैत्यभूमी परिसरात ऐवजी चर्नीरोड येथील बालभवनची जागा निश्चित करण्यात आली होती. परंतु उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनामुळे एक दिवसांचा दुखवटा जाहीर केल्याने रद्द करण्यात आले. मात्र, सलग दुसऱ्यांदा सर्व प्रकारची तयारी करूनही तसेच तसेच समाजाच्यावतीने याची तयारी केल्यानंतर हे कार्यक्रम रद्द झाल्याने नक्की हे भूमिपूजन होणार कधी असा सवाल केला जात आहे. (Bhagoji Keer, Nana Shankarsheth)

(हेही वाचा – Bhagoji Keer, Nana Shankarsheth Memorial सह मुंबईतील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पणांचा महायुतीचा धमाका)

नाना शंकर शेट यांच्या स्मारकासाठी अँटॉप हिलमधील जागा २०१४ मध्ये देण्यात आली हाती आणि २०१५ मध्ये ताबा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ३१ जुलै २०१५ मध्ये याचे भूमिपूजन तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार होता. परंतु माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचे निधन झाल्याने तीन दिवसांच्या दुखवट्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्यानंतर आयओडी, सीसी घेण्यात आली. परंतु प्रथम नोटबंदी आणि त्यानंतर कोविड यामुळे याचे काम सुरु होऊ शकले नाही, परंतु आता महापालिकेने ३५ कोटी रुपये मंजूर केल्याने त्यांच्या निधीतून हे काम केले जाणार आहे. त्यामुळेच याचे भूमिपूजन प्रथम सोमवारी होणार होते, पण ते रद्द झाल्याने गुरुवारी होते तेही रद्द झाले. त्यामुळे नानांच्या स्मारकासाठी नक्की मुहूर्त तरी कुठला असेल असा सवाल त्यांच्या समाजातील नागरिकांना होत आहे. (Bhagoji Keer, Nana Shankarsheth)

तर भागोजी किर यांच्या बहुप्रतिक्षित स्मारकाचे भूमिपूजन प्रथम सोमवारी होणार होते, ते रद्द झाल्याने गुरुवारी होणार होते तेही रद्द झाल्याने प्रत्यक्षात याचे भूमिपूजन कधी होणार असा सवाल भंडारी समाजाकडून केला जात आहे. मात्र, या स्मारकाच्या श्रेयवादावरून भंडारी समाजाचे अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर आणि भाजपाचे राजेश शिरवडकर यांच्या लढाई सुरु आहे. भागोजी किर यांचे भव्य स्मारक व्हावे अशाप्रकारची मागणी भाजपाचे दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यांच्या निवेदनानुसार तत्कालिन उपायुक्त रमाकांत बिरादर यांच्यासह सहायक आयुक्तांनी या स्मारकासाठी तीन जागा निश्चित करून चैत्यभूमी येथील भागोजी किर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरणाचे काम हाती घेण्याची तयारी दर्शवली होती. दरम्यान भंडारी समाजाचे नेते नविनचंद्र बांदिवडेकर यांनी शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर यांच्याकडे स्मारकासाठी मागणी केल्यानंतर त्यांनी याप्रकरणी तातडीने कार्यवाही केल्याने आपल्याच प्रयत्नाने हे काम होत असल्याचे बांदिवडेकर हे सांगत आहे. त्यामुळे भागोजी किर यांच्या स्मारकाच्या श्रेयावरून दोन भंडारी समाजाच्या नेत्यांमध्ये वाद दिसून येत आहे. (Bhagoji Keer, Nana Shankarsheth)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.