CC Road : मुंबईतील नवीन रस्त्यांची कामांना अद्यापही नाही सुरुवात, आचारसंहितेचा बसणार फटका?

1509
CC Road : मुंबईतील नवीन रस्त्यांची कामांना अद्यापही नाही सुरुवात, आचारसंहितेचा बसणार फटका?
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील टप्‍पा क्रमांक १ मधील उर्वरित कामे, टप्‍पा २ मधील नव्‍याने सुरू होणारी सिमेंट काँक्रिटची (CC Road) कामे ऑक्टोबर पासून सुरु होतील अशाप्रकारचा विश्वास महापालिक महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी व्यक्त केला असला तरी प्रत्यक्षात मुंबईतील एकाही कामाला अद्यापही सुरुवात झाली नसल्याची माहिती मिळत आहे. वाहतूक पोलिसांची परवानगी मिळत नसल्याने या कामांना सुरुवातच झालेली नसून प्रत्यक्षात या कामांना आचारसंहितेपूर्वी सुरुवात न झाल्यास ही कामे अजून काही दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई महानगरातील विविध रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरण (CC Road) कामे प्रगतिपथावर आहेत. पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाल्‍याचे भारतीय हवामान खात्‍याने जाहीर केले आहे. त्‍यामुळे, १ ऑक्‍टोबर २०२४ पासून रस्‍ते विकास कामांना वेग द्यावा. सिमेंट काँक्रिटीकरण कामाचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहावी यासाठी मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) यांची गुणवत्ता नियंत्रणासाठी त्रयस्थ संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. रस्ते विकासाची प्रत्‍यक्षपणे अंमलबजावणी होत असताना त्‍याचवेळी भारतीय तंत्रज्ञान संस्थेमार्फत गुणवत्‍ता तपासणीचे कामकाज सुरू करावे. ‘आयआयटी’ ने गुणवत्ता तपासणी काटेकोरपणे करावी, असे स्‍पष्‍ट निर्देश महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

(हेही वाचा – ‘रतन टाटा उद्योग रत्न पुरस्कार’ सह उद्योग भवनाला रतन टाटांचे नाव देणार; Uday Samant यांची माहिती)

मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण (CC Road) करण्याच्या उद्देशाने पहिल्या टप्प्यात ३९२ किलोमीटर तर दुसऱ्या टप्प्यात ३०९ किलोमीटर असे एकूण मिळून ७०१ किलोमीटर रस्ते काँक्रिटीकरणासाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये शहर विभाग, पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगरातील रस्ते कामांचा समावेश आहे. १ ऑक्‍टोबर २०२४ पासून रस्‍ते कामांची पूर्वतयारी सुरू होणे अपेक्षित आहे. तसेच, टप्‍पा क्रमांक १ मधील उर्वरित कामे, टप्‍पा २ मधील नव्‍याने सुरू होणारी कामे आवश्‍यक गती राखून व गुणवत्‍तेत कोणतीही तडजोड न होता सुरू होणे अपेक्षित आहे, असे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी विश्वास व्यक्त केला होता.

परंतु आता दहा ऑक्टोबर उलटला तरी मुंबईतील एकाही नवीन रस्त्यांच्या कामांना सुरुवात झालेली नाही. जर ज्या रस्त्यांची कामे सुरु झाली आहेत ती यापूर्वीच सन २०२१ व २०२२ मध्ये मंजूर झालेल्या कामांपैंकी आहे. मात्र, नव्याने हाती घेण्यात आलेल्या रस्त्यांचा त्यात समावेश नसून वाहतूक पोलिस विभागाची परवानगी न मिळाल्याने नवीन रस्त्यांची कामे हाती घेता आलेली नाही अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांची परवानगी मिळत नाही तोवर नवीन रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार नाही. मात्र, ज्या रस्त्यांचे कार्यादेश बजावल्यानंतर भूमिपूजन होऊन कामाला सुरुवात न झाल्यास त्या रस्त्यांची कामे आचारसंहितेमुळे रखडली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहितेपूर्वी रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाल्यास प्रत्यक्षात ही कामे आचारसंहितेच्या काळातही सुरु राहतील. अन्यथा ही कामे अजून काही महिने हाती घेता येणार नाही असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (CC Road)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.