महायुतीचा minority समाजाला खुश करण्याचा प्रयत्न!

128
महायुतीचा minority समाजाला खुश करण्याचा प्रयत्न!
  • खास प्रतिनिधी 

महायुती सरकारने ‘लाडकी बहीण’ योजना आणून सव्वादोन कोटी महिलांना लाभार्थी केले. अनेक जातीवर आधारित वेगवेगळी महामंडळे स्थापन करण्यास परवानगी दिली तसेच अल्पसंख्यांकानाही निवडणुकीआधी खुश करण्याचा प्रयत्न शिंदे सरकारने केला आहे. मदारश्यामधील शिक्षकांच्या मानधनात तब्बल १५० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ करण्याचा निर्णय घेतला तसेच महामंडळाचे भांडवल ३०० कोटी रुपयांनी वाढवले. (minority)

(हेही वाचा – BMC : उद्यानांच्या वार्षिक देखभाल कंत्राटप्रकरणी चौकशीची मागणी करणारे आणखी एक निवेदन आयुक्तांकडे)

लोकसभेला फटका

लोकसभा निवडणुकीत मुस्लिम आणि दलित मते महाविकास आघाडीच्या पारड्यात गेल्याने महायुतीला मोठा फटका बसला तर शिवसेना उबाठालाही फायदा झाला. भाजपाच्या खासदारांची संख्या २३ वरून खाली येत केवळ ९ वर आली तर काँग्रेसचा फक्त एक खासदार होता ती आता १३ अधिक एक अपक्ष अशी १४ वर गेली. शिवसेना उबाठाचे काही उमेदवार केवळ अल्पसंख्यांक मतांवर निवडून आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. महायुती सरकारने गुरुवारी (१० ऑक्टोबर २०२४) रोजी मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल ८० निर्णय घेतले. (minority)

(हेही वाचा – ‘रतन टाटा उद्योग रत्न पुरस्कार’ सह उद्योग भवनाला रतन टाटांचे नाव देणार; Uday Samant यांची माहिती)

मदरश्यांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ

मदरश्यांमधील डी. एड., बी. एड. शिक्षकांना देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेत राज्यातील मदरसांमध्ये पारंपरिक, धार्मिक शिक्षणाबरोबरच गणित, विज्ञान, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दूचे शिक्षण देण्यासाठी कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची नेमणूक करण्यात येते. सध्या डी. एड. शिक्षकांना सहा हजार रुपये मानधन देण्यात येते, ते १६ हजार रुपये करण्यात येईल. तसेच माध्यमिकचे विषय शिकवणाऱ्या बी. ए. बी. एड., बी. एस्सी-बी. एड. शिक्षकांचे मानधन आठ हजार रुपयांवरून थेट १८ हजार रुपये करण्यात येईल, असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. (minority)

(हेही वाचा – Pune : मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु; पुण्यातून ७२९ ज्येष्ठ नागरिक अयोध्येला रवाना)

मौलाना आझाद महामंडळाच्या भागभांडवलात वाढ

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे भागभांडवलही १,००० कोटी रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सध्या हे भांडवल ७०० कोटी रुपये एवढे आहे. या महामंडळामार्फत विविध कर्ज, पतपुरवठा योजना राबवण्यात येतात. (minority)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.