Crime : ॲप्लिकेशनच्या माध्यमातून समलैंगिकांना लुटणाऱ्या टोळीला पवईतून अटक

101
Crime : समलैंगिक ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तरुणांना लुटणाऱ्या टोळीला पवईतून अटक
  • प्रतिनिधी 

पवई पोलिसांनी समलैंगिक तरुणांना लुटणाऱ्या एका टोळीला अटक केली आहे. ही टोळी आपल्या मोबाईलमध्ये ‘समलैंगिक संबंधित ॲप्लिकेशन’ डाउनलोड करून त्यामार्फत समलैंगिक तरुणांसोबत चॅटिंग करून त्यांना निर्जन ठिकाणी बोलावून त्यांची लूटमार करीत होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या टोळीने मागील काही महिन्यांत अनेकांची लूट केल्याचे समोर आले आहे. (Crime)

निलेश राजेंद्र साळवे (२१), राहुल सिंग तिरवा (२५) आणि साहिल सोनावणे (२३) असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे असून त्यांचे इतर सहकारी देखील असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ही टोळी पवईतील आयआयटी मार्केट येथे राहणारी आहे. पवई पोलीस ठाण्यात सप्टेंबर महिन्यात लुटमारीच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. लुटले गेलेले तरुण २० ते २२ वयोगटातील आहेत. ही टोळी या तरुणांना निर्जन ठिकाणी बोलावून त्यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करीत होते. त्यानंतर त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने तसेच रोकड, किंवा यूपीआय वरील पैसे जबरदस्तीने स्वतःच्या यूपीआय आयडीवर ट्रान्सफर करून घेत होती. (Crime)

(हेही वाचा – Pune : मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु; पुण्यातून ७२९ ज्येष्ठ नागरिक अयोध्येला रवाना)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमच्याकडे या संदर्भात तीन गुन्हे दाखल झाले होते, तिन्ही गुन्ह्यांमध्ये लुटण्याची पद्धत सारखीच होती. हा प्रकार गंभीर असल्यामुळे गुन्हे प्रकटीकरण पथकाने या टोळीचा तांत्रिकदृष्ट्या शोध घेऊन पवई परिसरातून या तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. (Crime)

अटक करण्यात आलेल्या तिघांचे मोबाईल फोन तपासण्यात आले असता या तिघांच्या मोबाईल फोन मध्ये ‘समलैंगिक ॲप्लिकेशन’ (गे ॲप) आढळून आले. त्यांच्याकडे याबाबत चौकशी केली असता आरोपीपैकी कोणीही समलैंगिक संबंध ठेवणारे नसून त्यांनी हे ॲप्लिकेशन केवळ समलैंगिक तरुणांना लक्ष्य करून त्यांना लुटण्याचा उद्देशाने डाउनलोड केले गेले होते. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आरोपी स्वतःला समलैंगिक असल्याचे समोरच्याला भासवून त्यांच्या सोबत चॅटिंग करून त्यांना भेटायला बोलावत असे त्यानंतर भेटायला आलेल्या तरुणांना चाकूचा धाक दाखवून त्यांना लुटत होती अशी माहिती तपसात समोर आली आहे. पवई पोलिसांनी या तिघांना अटक करून त्यांच्याविरुद्ध जबरी चोरी, फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. (Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.