महाराष्ट्रात पुन्हा एकदा परतीच्या पावसाने (Mumbai Rain) थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वीजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडतोय. महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पालघर, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर सारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस पडतोय.
10 Oct,10.14 pm Mumbai radar indicate mod to intense thunder clouds around Mumbai, Thane (40 to 50dBz) with cloud heights been 6 to 8 kms now.
Possibility of mod to intense rains over Kalyan side,Mumbai light to mod for next 2,3hrs.Winds westward
Satellite obs confirms the same. pic.twitter.com/sPWV13alv7— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 10, 2024
तर दुसरीकडे या परतीच्या पावसाने (Mumbai Rain) गरब्याचा देखील खेळ बिघडवला आहे. हवामान खात्याने आजही (११ ऑक्टो.) जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर विभागाला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Mumbai Rain)
अरबी समुद्रातील ठळक कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडे सरकले असून गोव्याच्या किनाऱ्यालगत सक्रिय झाले आहेत. परिणामी वायव्येकडे जाताना या कमी दाब क्षेत्राची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. याला लागूनच समुद्र सपाटीपासून ५.८ कि.मी उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. पुढचे २-३ दिवस पाऊस धुमाकूळ घालणार असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. (Mumbai Rain)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community