मास्टर लिस्टवरील पात्र लाभार्थ्यांकडून रेडी रेकनरच्या आता ११० टक्के रकमेची आकारणी; म्हाडा उपाध्यक्ष Sanjeev Jaiswal यांची घोषणा

242
मास्टर लिस्टवरील पात्र लाभार्थ्यांकडून रेडी  रेकनरच्या आता ११० टक्के रकमेची आकारणी; म्हाडा उपाध्यक्ष Sanjeev Jaiswal यांची घोषणा
मास्टर लिस्टवरील पात्र लाभार्थ्यांकडून रेडी  रेकनरच्या आता ११० टक्के रकमेची आकारणी; म्हाडा उपाध्यक्ष Sanjeev Jaiswal यांची घोषणा
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाच्या बृहतसूचीवरील (मास्टर लिस्ट)पात्र मूळ भाडेकरू / रहिवाशी यांना देण्यात येणाऱ्या जुन्या निवासी गाळ्याच्या मूळ/ अनुज्ञेय क्षेत्रफळाव्यतिरिक्त जास्त क्षेत्रफळाकरिता आकारण्यात येणाऱ्या शीघ्रसिद्ध गणकदाराच्या अर्थात  रेडी रेकनरच्या १२५ टक्के रकमेऐवजी ११० टक्के रकमेची आकारणी करण्याचा धोरणात्मक निर्णय म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी  घेतला आहे. (Sanjeev Jaiswal)
मास्टर  (MHADA) लिस्ट वरील भाडेकरू, रहिवाश्यांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने आयोजित बैठकीमध्ये जयस्वाल यांनी सांगितले की, मास्टर  लिस्टवरील बहुसंख्य भाडेकरू/रहिवाशी यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. तसेच त्यांना  देय असलेल्या ३०० चौरस फुट क्षेत्रफळाच्या पर्याप्त सदनिका विकासकांकडून मंडळास उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे त्यांना अनुज्ञेय असलेल्या ३०० चौरस फुटाच्या सदनिका पात्र लाभर्थ्यांना मंडळास देणे शक्य होत नाहीत व परिणामी त्यांना जास्त क्षेत्रफळाच्या सदनिका वितरित करण्यात येतात. मात्र, त्याकरिता वाढीव क्षेत्रफळापोटी १२५ टक्के दराने शीघ्रसिद्ध गणकदाराने येणारी रक्कम लाभार्थ्यांना भरावी लागत आहे. तसेच  जयस्वाल यांनी पुढे मांडणी केली की, अनेक प्रकरणात असे निदर्शनास आले आहे की या पात्र लाभार्थ्यांकडून बिकट आर्थिक परिस्थितीमुळे सदर अतिरिक्त रकमेचा भरणा होत नसल्यामुळे त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणे मंडळास शक्य होत नाही. परिणामी अशी प्रकरणे मंडळाकडे मोठ्या प्रमाणात प्रलंबित राहत आहेत. या पार्श्वभूमीवर जुन्या उपकरप्राप्त इमारतींतील लाभार्थ्यांचे पुनर्वसन प्रभावी व गतिमानपणे शक्य व्हावे यादृष्टीने  जयस्वाल यांनी सदर निर्णय घेतला आहे. (Sanjeev Jaiswal)
मास्टर  लिस्टवरील पात्र मूळ भाडेकरू / रहिवाशी यांची पात्रता निश्चिती करणे, तसेच त्यांना सदनिका वितरण करण्याकरिता   मास्टर  लिस्टवरील पात्र अर्जदारांच्या जुन्या निवासी गाळ्याच्या क्षेत्रफळानुसार नवीन वितरित करावयाच्या निवासी गाळ्याचे क्षेत्रफळ निश्चित करण्याचे धोरण  जयस्वाल यांनी यापूर्वीच निश्चित केले आहे. (Sanjeev Jaiswal)
या धोरणात्मक निर्णयामुळे वर्षानुवर्षे संक्रमण शिबिरांत वास्तव्यास असलेल्या भाडेकरू रहिवाश्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे तसेच या निर्णयामुळे मंडळाला मास्टर  लिस्टवरील भाडेकरू रहिवाशांना हक्काचे घर देण्याची प्रक्रिया देखील सुलभ व सोपी होणार आहे. ज्याचा व्यापक परिणाम मास्टर  लिस्टवरील भाडेकरू रहिवाश्यांच्या पुनर्वसन प्रक्रियेवर होणार असल्याचे मत मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी चर्चेदरम्यान मांडले. (Sanjeev Jaiswal)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.