Gopichand Padalkar: जातीत भांडण लावून देण्याचे शरद पवार स्वप्न बघत आहेत, ते उद्ध्वस्त करा; गोपीचंद पडळकरांचे आवाहन

138
Gopichand Padalkar: जातीत भांडण लावून देण्याचे शरद पवार स्वप्न बघत आहेत, ते उद्ध्वस्त करा; गोपीचंद पडळकरांचे आवाहन
Gopichand Padalkar: जातीत भांडण लावून देण्याचे शरद पवार स्वप्न बघत आहेत, ते उद्ध्वस्त करा; गोपीचंद पडळकरांचे आवाहन

सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातल्या आरेवाडी येथे आयोजित बहुजनांच्या दसरा मेळाव्यामध्ये बोलताना भाजपा आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. शरद पवार आणि रोहित पवारांची अवस्था फरडया सापा सारखी झाली आहे. तसेच जाती जातीत भांडण लावून शरद पवार (Sharad Pawar) जे स्वप्न बघत आहेत, ते स्वप्न उद्ध्वस्त करा, असे आवाहन देखील गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.

(हेही वाचा-महाराष्ट्राला Central Govt कडून 11,255 कोटींचे कर हस्तांतरण)

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले, “इंदापूरमध्ये जाऊन शरद पवारांनी सत्ता द्या चेहरा मी बदलतो,असे विधान केले. मग 40 वर्षे सत्ता होती, तुम्ही काय लोटत होता का ? तुम्ही 4 वेळा मुख्यमंत्री, आता त्यांच्या नातवाला उपमुख्यमंत्री पदाचे स्वप्नं पडलेत. यामुळे आजोबा आणि नातूची अवस्था फरड्या ( सापा ) सारखे झाली आहे. जो मेंढ्या राखायला गेल्यावर आपल्याला दिसतो, जो छोटासा असतो पण ताटतो.” अशी टीका गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली आहे.

(हेही वाचा-Attack Durga Puja : दुर्गादेवीच्या मंडपातील हिंदूंवर कट्टरपंथींचा हल्ला; असलम, सुलतान, मुन्नाने केली दगडफेक)

राज्य सरकारकडून धनगर आरक्षणाच्या बाबतीत काढण्यात आलेले शुद्धीपत्रकावर बोलताना पडळकर म्हणाले, राज्य सरकारने शुद्धीपत्रक काढले, सिद्ध करून घेतले, महसूल व वन विभागाने काढला, ज्यामध्ये 36 नंबर आहे, तिथे धनगड वाचावे असे स्पष्ट केलं. त्यामुळे धनगर राज्याबाहेरचं आहेत, ते सिद्ध झाले. आपण देवेंद्र फडणवीस यांना रात्री फोन करून ही बाब निदर्शनास आणून दिली, पण ते शुद्धीकरण पत्रक कुणी काढले आहे. ते देवेंद्र फडणवीस यांना माहिती नाही, त्यामुळे त्यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले. त्यांनी पण ते काढले नसल्याचे स्पष्ट केलं. फडणवीस यांनी रात्री 1 वाजता आदेश दिला. त्यामुळे आज सकाळी आपल्याला जसे पाहिजे तसे ड्राफ्ट करून शुद्धीकरण पत्रक आदेश रद्द केल्याचं पत्र काढण्यात आले, असंही पडळकर (Gopichand Padalkar) यांनी नमूद केलं.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.