-
ऋजुता लुकतुके
मुंबईचा उगवता क्रिकेटपटू मुशीर खानला (Musheer Khan) इराणी चषकाच्या अंतिम फेरीपूर्वी अपघात झाला होता. कानपूरहून लखनैला जात असताना त्याची गाडी उलटली. यात त्याच्या मानेला जबर धक्का बसला. या दुखापतीमुळे मुशीरला २ ते ३ महिने क्रिकेट खेळता येणार नाहीए. रणजीचा सुरुवातीचा हंगाम तो मुकणार आहे. शिवाय भारतीय ए संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही त्याची निवड होणं कठीण आहे. (Rohit Sharma)
(हेही वाचा- Pune Hit and run : ऑडी चालकाने दुचाकीस्वाराला दिली धडक, २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू)
मुशीर हा सध्या भारतीय संघात असलेला सर्फराझ खानचा (Sarfaraz Khan) लहान भाऊ आहे. मुंबईने २७ वर्षांनंतर इराणी चषक जिंकला. आणि यात सर्फराझने नाबाद २२२ धावा करत महत्त्वाची भूमिका बजावली. मुशीर मात्र हा सामना खेळू शकला नाही. त्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) मुंबईत मुशीरच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. या भेटीनंतर मुशीरने रोहीत आणि वडील नौशाद खान यांच्याबरोबरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
View this post on Instagram
१९ वर्षीय मुशीर खान (Musheer Khan) भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. या संघाने अलीकडेच विश्वचषकात उपविजेतेपद मिळवलं आहे. या स्पर्धेतही ७ सामन्यांमध्ये मुशीरने ६० च्या सरासरीने ३६० धावा केल्या होत्या. यात दोन शतकं आणि एका अर्धशतकाचा समावेश होता. १३१ ही त्याची वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या होती. अंतिम फेरीत मात्र भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. (Rohit Sharma)
(हेही वाचा- Rafael Nadal Retires : २२ ग्रँडस्लॅम विजेता राफेल नदाल आंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्त )
त्यानंतर अलीकडेच मुशीरने रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत शतक झळकावून मुंबईच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावली होती. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये मुंबईसाठी खेळताना त्याने ५ डावांत ७१५ धावा केल्या आहेत. नुकत्याच झालेल्या दुलिप करंडक स्पर्धेतही त्याने शतक झळकावलं होतं. (Rohit Sharma)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community