Vidhansabha Election 2024 : विधानसभेसाठी शरद पवारांनी डाव टाकला; पण उलटणार त्यांच्यावरच ?

367
Vidhansabha Election 2024 : विधानसभेसाठी शरद पवारांनी डाव टाकला; पण उलटणार त्यांच्यावरच ?
Vidhansabha Election 2024 : विधानसभेसाठी शरद पवारांनी डाव टाकला; पण उलटणार त्यांच्यावरच ?
लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांना धोबीपछाड दिल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी विधानसभेचे मैदान मारण्याची तयारी केली आहे. त्यासाठी पवार तीन दिवस पुण्यात तळ ठोकून होते. इंदापूर विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या सोबत गेलेले दत्ता भरणे यांना शह देण्यासाठी शरद पवारांनी डाव टाकत हर्षवर्धन पाटील यांच्या हाती तुतारी देत उमेदवारीही जाहीर केली.शरद पवार यांचा हाच डाव त्यांच्याच पक्षातील काही इच्छुक मंडळी उधळून लावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इंदापूरमध्ये आज मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता आहे. (Vidhansabha Election 2024)
 
नक्की इंदापुरात घडतय काय ?
हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी भाजपची साथ सोडत शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षात प्रवेश केला. इंदापूर विधानसभेची जागा ही महायुतीत अजित पवारांकडे जाणार आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारीही जाहीर करण्यात आली. पण, त्यांच्याच उमेदवारीवरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील एक गट नाराज झाला आहे. याच नाराजांपैकी काहीजण इंदापूरमधून विधानसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी प्रयत्नशील होते. उमेदवारीची अपेक्षा बाळगून बसलेला हा नाराजांचा गट आता एकत्र येऊन बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. (Vidhansabha Election 2024)
इंदापूर मार्केट यार्ड मध्ये भुमिका मांडणार 
हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील नाराज आज इंदापूर मार्केट यार्ड च्या मैदानात मेळावा घेणार आहेत. हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे प्रवीण माने (Pravin mane),आप्पासाहेब जगदाळे (Appasaheb Jagdale) आणि भरत शहा नाराज आहेत. हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारी रद्द करण्याची तिघांनीही पक्षाकडे मागणी केली आहे.आजच्या मेळाव्यात अपक्ष लढण्याची भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. नाराजांनी अपक्ष लढण्याची भूमिका घेतल्यास इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. (Vidhansabha Election 2024)
आयात उमेदवार नको…
हर्षवर्धन पाटील यांच्या शरद पवार (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेशानंतर काही नाराज मंडळींनी स्थानिक खासदार सुप्रिया सुळे यांना भेटून आयात उमेदवार नको अशी आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली होती. यावर लवकरच मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन सुळे यांच्याकडन् देण्यात आले होते. परंतु दिलेल्या वेळेत कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याचे पाहून नाराजांचा गट आता वेगळी भुमिका घेण्यासाठी सज्ज झाला आहे.  (Vidhansabha Election 2024)
हेही वाचा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.