२१ वे शतक आमचे; भारत-आसियान शिखर परिषदेत PM Narendra Modi यांचे उद्गार

138
२१ वे शतक आमचे; भारत-आसियान शिखर परिषदेत PM Narendra Modi यांचे उद्गार
२१ वे शतक आमचे; भारत-आसियान शिखर परिषदेत PM Narendra Modi यांचे उद्गार

पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) गुरुवारी (१० ऑक्टो.) लाओसची (Laos) राजधानी व्हिएन्टिनमध्ये भारत-आसियान शिखर परिषदेत (India-ASEAN Summit) सहभागी झाले होते. यादरम्यान मोदींनी भारत-आसियान शिखर परिषदेलाही संबोधित केले. शिखर परिषदेत बोलताना ते म्हणाले, “21 वे शतक हे भारत आणि आसियान देशांचे शतक आहे असे मी मानतो. आज जगाच्या अनेक भागांमध्ये संघर्ष आणि तणाव असताना भारत आणि आसियान यांच्यातील मैत्री, संवाद आणि सहकार्य खूप महत्त्वाचे आहे.” असं त्यांनी नमूद केले.

लाओसमध्ये भारत आणि ब्रुनेईदरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्याची घोषणाही मोदींनी (PM Narendra Modi) केली. पंतप्रधान मोदी लाओसमध्ये 10व्यांदा भारत-आसियान शिखर परिषदेत सहभागी झाले होते. तत्पूर्वी ते लाओसला पोहोचल्यावर बौद्ध भिक्खूंनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदींनी व्हिएन्टिनमध्ये लाओसचे रामायणही पाहिले. पंतप्रधान मोदी आज पूर्व आशिया शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषदेत चीन, अमेरिका आणि रशियाही सहभागी होणार आहेत. (PM Narendra Modi)

पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले, “मी भारताचे अॅक्ट-ईस्ट धोरण जाहीर केले होते. गेल्या दशकात या धोरणामुळे भारत आणि आसियान देशांमधील संबंधांना नवी ऊर्जा, दिशा आणि गती मिळाली आहे.” पंतप्रधान मोदींनी व्हिएन्टिनमध्ये जपानचे पंतप्रधान इशिबा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. भेटीनंतर पीएम मोदींनी X वर पोस्ट करत जपानचे पंतप्रधान इशिबा यांना भेटून आनंद झाल्याचे लिहिले. सेमीकंडक्टर पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी, संरक्षण आणि इतर क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली. (PM Narendra Modi)

यानंतर पंतप्रधान मोदींनी न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. या भेटीत मोदींनी क्रिस्टोफर लक्सन यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले. भेटीनंतर न्यूझीलंडचे पीएम क्रिस्टोफर म्हणाले की, मी भारताचा चाहता आहे, हा देश त्यांना खूप आवडतो. या बैठकीनंतर मोदी लाओसचे पंतप्रधान सोनेक्से सिफंडन यांच्या निमंत्रणावरून एका भव्य डिनरमध्ये सहभागी झाले होते. डिनरदरम्यान त्यांनी अनेक नेत्यांची औपचारिक भेट घेतली. (PM Narendra Modi)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.