Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सॅल्यूट, पहा व्हिडीओ

230
Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सॅल्यूट, पहा व्हिडीओ
Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सॅल्यूट, पहा व्हिडीओ

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Navi Mumbai Airport) पहिल्या धावपट्टीवर वायुदलाच्या लढाऊ विमानाद्वारे उड्डाण चाचणी घेण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत ही पहीली चाचणी यशस्वीरित्या पार पडली. नवी मुंबई विमानतळाच्या (Navi Mumbai Airport) पहिल्या धावपट्टीवरून भारतीय वायूदलाचं सी-२९५ हे विमान अवकाशात झेपावलं. वे लढाऊ विमान विमानतळ व नवी मुंबईच्या आकाशात काही वेळ उड्डाण केल्यानंतर त्याच धावट्टीवर यशस्वीरित्या उतरलं. धावपट्टीच्या बाजूने पाण्याचे फवारे उडवून या विमानाला मानवंदना देखील देण्यात आली.

२०२५ पर्यंत विमान वाहतूक सुरू
२०२५ पर्यंत या विमानतळावरून देशांतर्गत विमान वाहतूक सुरू होईल, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. विमानाची चाचणी यशस्वी झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shide) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी धावपट्टीची पाहणी केली. तसेच विमानाची पाहणी केली. विमानतळावर दोन रनवे तयार करण्यात आले आहे. (Navi Mumbai Airport)

कुठेही चेक इन केले तरी प्रवाशांना फ्लाईटपर्यंत पोहचता येणार
विमानतळावरील 4 टर्मिनलवर जवळपास 350 विमाने एकाच वेळी पार्क केली जाऊ शकतात. तसेच या विमानतळावर मेट्रोसह बुलेट ट्रेनची कनेक्टिव्हिटी असणार आहे. सिडकोकडून हे विमानतळ उभारण्यात येत आहे. नवी मुंबई विमानतळावर 4 टर्मिनल बिल्डिंग आहेत. मात्र कुठेही चेक इन केले तरी प्रवाशांना त्यांच्या फ्लाईटपर्यंत पोहचता येणार आहे. (Navi Mumbai Airport)

अजून अनेक चाचण्या विमानतळावर यापूढे चालूच राहणार असून या चाचण्यांच्या अहवालानंतर प्रत्यक्षात विमानतळ वापरासंदर्भातील परवानग्यांसाठी हालचाली सूरु होणार आहेत. लहान विमानाने धावपट्टी क्रमांक २६/०८ यावरील उपकरणीय यंत्रातून वैमानिकांना मिळणारी माहिती (इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम) ची चाचणी सूरु झाली आहे. जुलै महिन्यात अशाच चाचण्यांचे नियोजन केलं होतं. परंतु, मुसळधार पावसामुळे ही चाचणी पुढे ढकलण्यात आली होती. (Navi Mumbai Airport)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.