UPI Transactions : काय आहे युपीआय व्यवहाराची नवी मर्यादा

UPI Transactions : रिझर्व्ह बँकेनं पतधोरण जारी करताना युपीआय व्यवहारात काही बदल केले आहेत. 

176
Paytm Can Add UPI Users : पेटीएमला नवीन युपीआय ग्राहक जोडण्याला परवानगी
  • ऋजुता लुकतुके

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नुकतेच युपीआय १२३ आणि युपीआय लाईटच्या व्यवहारांची मर्यादा वाढवली आहे. त्यामुळे अर्थातच, युपीआयच्या वापराला आणखी चालना मिळणार आहे. युपीआयमुळे डिजिटल व्यवहार सर्वसमावेशक झाल्याची टिप्पणी दास यांनी केली. छोट्या व्यवहारांची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीने युपीआय १२३ आणि युपीआय लाईट यांच्या व्यवहारांची मर्यादाही वाढवली आहे. त्यामुळे जास्त लोकांपर्यंत या सुविधा पोहोचतील असं मध्यवर्ती बँकेला वाटतं. (UPI Transactions)

युपीआय १२३ वरील व्यवहाराची मर्यादा आता ५,००० रुपयांवरून १०,००० रुपयांवर आली आहे. तसंच युपीआय लाईट द्वारे पिन शिवाय व्यवहार करता येतो. त्याची मर्यादा आता ५०० रुपयांवरून १००० रुपये करण्यात आली आहे. तर युपीआय लाईटच्या वॉलेटमध्ये आता तुम्ही १०,००० रुपयांपर्यंत पैसे साठवू शकणार आहात. ही मर्यादा आधी ५,००० रुपये होती. (UPI Transactions)

(हेही वाचा – Eng vs Pak, 1st Test Match : इंग्लंडचा ७ बाद ८२३ धावांचा डोंगर, हॅऱी ब्रूक, जो रुट यांचे फलंदाजीचे विक्रम )

त्याचबरोबर तुमच्या युपीआय लाईट वॉलेटवर रिझर्व्ह बँकेनं आता आणखी एक सुविधा देऊ केली आहे. वॉलेटची मर्यादा १०,००० रुपयांवर गेली आहे. हे वॉलेट आता तुम्ही ऑटो टॉप-अप करू शकणार आहात. म्हणजेच वॉलेटमधील पैसे ठरावीक प्रमाणात कमी झाले. तर ते बँकेला पूर्वनिर्देश देऊन आपोआप भरले जातील. म्हणजे तुमचं वॉलेट कायम भरलेलं राहू शकेल. ऑटो टॉप-अपचा निर्देश तुम्ही कधीही काढून घेऊ शकता. तुमच्या ॲपशी जोडलेल्या बँक खात्यातून हे पैसे वॉलेटमध्ये जमा होतील. (UPI Transactions)

अलीकडेच रिझर्व्ह बँकेनं युपीआयच्या माध्यमातून एटीएम केंद्रावर कॅशचा भरणा करण्याची सोयही उपलब्ध करून दिली आहे. डेबिट किंवा इतर कुठलंही कार्ड न वापरता आता तुम्ही पैसे बँक खात्यात भरू शकणार आहात. त्यामुळे डेबिट कार्डांचं महत्त्व कमी होणार असलं तरी लोकांसाठी ही मोठी सुविधा आहे. अशा व्यवहारांची मर्यादा ५०,००० रुपये करण्यात आली आहे. अशा सुविधेला इंटरऑपरेटेड कॅश डिपॉझिट असं म्हणतात. (UPI Transactions)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.