- ऋजुता लुकतुके
दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने (Rafael Nadal) वयाच्या ३७ व्या वर्षी व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. नोव्हेंबर महिन्यात डेव्हिस चषकाची बाद फेरी ही त्याची शेवटची स्पर्धा असणार आहे. २२ ग्रँडस्लॅम विजेतेपदांचा धनी असलेला नदाल गेली दोन वर्षं दुखापतींमुळे बेजार होता. मनात असूनही तो सातत्याने खेळू शकलेला नाही. अखेर गुरुवारी त्याने आंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने शेवटची ग्रँडस्लॅम २०२३ साली फ्रान्समध्ये जिंकली होती.
आपल्या २० वर्षांहून अधिक कारकीर्दीत नदालने २२ ग्रँडस्लॅमसह एकूण ९६ एटीपी विजेतेपदं आपल्या नावावर केली. तब्बल १७ वर्षं तो जागतिक क्रमवारीत किमान पहिल्या दहांत होता. टेनिसमधील तीन सर्वकालीन दिग्गज खेळाडू रॉजर फेडरर, राफेल नदाल (Rafael Nadal) आणि नोवाक जोकोविच यांच्यातील एक नदालच्या नावावर टेनिसमधील आणि खास करून क्ले कोर्टवरील अनेक विक्रम जमा आहेत. यातले काही असे आहेत, जे कदाचित कधीच मोडले जाऊ शकणार नाहीत. अशाच पाच विक्रमांवर नजर टाकूया,
(हेही वाचा – Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सॅल्यूट, पहा व्हिडीओ)
नदालने फ्रेंच ओपन स्पर्धा विक्रमी १४ वेळा जिंकली आहे. एकच स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकण्याचा त्याचा विक्रम आहे. त्यातही १४ ग्रँडस्लॅम विजेतेपदांचा आकडा कुणी गाठेल हे कठीणच आहे. २००५ ते २०१४ या काळात त्याने दरवर्षी किमान एक ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली. हा ही एक विक्रमच आहे आणि त्याच्या बरोबरीचे रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच यांनाही ही कामगिरी जमलेली नाही. नदालच्या खेळाच्या शैलीमुळे त्याला वारंवार दुखापती व्हायच्या. पण, असं असताना सलग दहा वर्षी त्याने किमान एक ग्रँडस्लॅम जिंकली आहे. (Rafael Nadal)
एकाच स्पर्धेत १० पेक्षा जास्त विजेतेपदं पटकावण्याची किमया नदालने (Rafael Nadal) ४ स्पर्धांमध्ये केली आहे. त्याने फ्रेंच ओपन (१४), बार्सिलोना ओपन (१२), माँटे कार्लो मास्टर्स (११) आणि इटालियन ओपन (१०) वेळा जिंकली आहे. नदालला क्ले कोर्टचा बादशाह म्हटलं जायचं. त्याने २४ वर्षं ३ महिने आणि १० दिवसांचा असताना कारकीर्दीतील गोल्डन स्लॅम आणि करिअर ग्रँडस्लॅम पूर्ण केली होती. ही कामगिरी करणारा तो वयाने सगळ्यात लहान टेनिसपटू ठरला आहे. एकाच हंगामात क्ले कोर्टवरील तीनही एटीपी मास्टर्स स्पर्धा आणि शिवाय फ्रेंच ओपन जिंकणारा तो एकमेव टेनिसपटू आहे. २०१० मध्ये त्याने माँटे कार्लो मास्टर्स, माद्रिद ओपन आणि इटालियन ओपन या तीन मास्टर्स स्पर्धा तर फ्रेंच ओपनही जिंकली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community