- ऋजुता लुकतुके
हॉकी इंडिया लीग (Hockey India League) सात वर्षांनंतर पुनरागमन करत आहे. लीगसाठी खेळाडूंच्या लिलावाची तारीख ठरली आहे ती १३ ते १५ ऑक्टोबर. नवी दिल्लीत हा लिलाव पार पडणार आहे. यापूर्वी ही लीग फक्त पुरुषांसाठी होती. पण, यंदापासून महिलांचे ४ संघही सहभागी होणार आहेत. पुरुष व महिला अशा दोन लीग एकाच वेळी सुरू राहणार आहेत. पुरुषांच्या ८ आणि महिलांच्या ६ फ्रँचाईजी निश्चित करण्यात आल्या आहेत. आता लक्ष असणार आहे ते खेळाडूंच्या लिलावावर. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने या लीगला मान्यता देत एक महिन्याचा कालावधी या स्पर्धेसाठी निश्चित केला आहे. या वेळेत कुठलीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा होणार नाही. त्यामुळे या लीगला आणि खेळाडूंच्या लिलावालाही महत्त्व प्राप्त झालं आहे. एकूण १००० पेक्षा जास्त खेळाडूंनी लिलावासाठी नाव नोंदणी केली आहे.
(हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्मा ऑस्ट्रेलियातील एका कसोटीला मुकणार?)
अननुभवी आणि आंतरराष्ट्रीय अनुभव असलेल्या खेळाडूंचं चांगलं मिश्रण या खेळाडूंमध्ये आहे. अनुभव आणि कौशल्याच्या जोरावर खेळाडूंचे तीन गट पाडण्यात आले आहेत. पहिल्या गटातील खेळाडूंची मूळ किंमत २ लाख रुपये आहे. तर दुसऱ्या गटातील खेळाडूंची किंमत ५ लाख रुपये आहे. तिसऱ्या गटातील खेळाडूंची किंमत १० लाख रुपये आहे. मूळ किमतीपासून खेळाडूंची बोली सुरु होईल. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावलेल्या संघातील हरमनप्रीत सिंग, हरेंद्र सिंग, हार्दिक सिंग, मनप्रीत सिंग आणि मनदीप सिंग हे प्रमुख खेळाडू लिलावात आहेतच. याशिवाय रुपिंदरपाल सिंग, विरेंद्र लाकरा तसंच धरमवीर सिंगही लिलावाच्या प्रक्रियेतून जाणार आहेत. (Hockey India League)
(हेही वाचा – Mukesh Ambani : फोर्ब्सच्या श्रीमंत भारतीयांच्या यादीत मुकेश अंबानीच अव्वल )
आर्थर व्हॅन दोरेन, अलेक्झांडर हेनरिक्स, गोंझालो पिलाझ, थिओरी ब्रिंकमान हे आंतरराष्ट्रीय स्टारही हॉकी इंडिया लीग खेळण्यासाठी उत्सुक आहेत. २८ डिसेंबर २०२४ पासून ही लीग सुरू होणार आहेत. महिलांची लीग रांची इथं तर पुरुषांची लीग रुरकेला इथं होणार आहे. प्रो हॉकी लीगवर तब्बल ३,६४० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. हॉकी इंडिया या लीगवर मागचे सहा महिने काम करत आहे. त्यानंतर पुरुषांचे ८ आणि महिलांचे ६ संघ घेऊन लीग सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे. आतापर्यंत १० फ्रँचाईजी मालक संघांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी समोर आले आहेत. या मालकांबरोबर तब्बल १० वर्षांचा करार करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा ही लीग (Hockey India League) शाश्वत असेल असा अंदाज आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community