पंढरपुरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भक्त दरवर्षी पंढरपुरात येत असतात. अशावेळी भक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी भक्तनिवास चालवले जाते. मात्र सायबर गुन्हेगारांनी आता चक्क भक्तनिवासाच्या नावे ऑनलाईन फ्रॅड केलेला आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या भक्तनिवासामधील खोल्यांची आगाऊ नोंदणी करून भक्तांच्या फसवणुकीचे काम या सायबर गुन्हेगारांनी केले आहे. (Cyber Fraud)
(हेही वाचा : Rohit Sharma : रोहित शर्मा ऑस्ट्रेलियातील एका कसोटीला मुकणार?)
दरम्यान भक्तांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे, अशी माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीने दिलेल्या माहितीनुसार, मंदिरे समितीचा सर्व्हे क्रमांक ५९ येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास आहे. भक्तनिवासामध्ये खोली नोंदणीसाठी www.yatradham.org या संकेतस्थळावरून ‘ऑनलाईन’ सुविधा उपलब्ध आहे. ‘ऑफलाईन’ पद्धतीने प्रत्यक्ष येऊन नोंदणी सुविधा उपलब्ध आहे. मात्र श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवासाच्या नावाने www.Shrivitthalrukminibhaktnivas.in अशा खोट्या संकेतस्थळावरून भक्तांकडून निवासाची आगाऊ नोंदणी केल्या जात आहेत. ज्यामुळे भाविकांची आर्थिक फसवणूक असल्याचे कळते, अशी माहिती मंदिर समितीने दिली. (Cyber Fraud)
त्याचबरोबर भाविकांची फसवणूक होऊ नये आणि फसवणूक झालेल्यांना न्याय मिळावा यासाठी समितीने पंढरुपूर शहर येथील पोलिस ठाण्यात समितीच्या वतीने लेखी तक्रार देण्यात आली आहे. त्यामुळे भावि कांना भक्तनिवासाची नोंदणी करायची असल्यास भाविकांनी www.yatradham.org या संकेतस्थळाद्वारे किंवा ऑफलाईन पद्धतीने खोलीची नोंदणी करावी, असे आवाहन मंदिरे समितीच्या वतीने करण्यात आले आहे.(Cyber Fraud)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community