विजयादशमीचे औचित्य साधत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शहरातील प्रमुख भागातील २२ ठिकाणी संचलन होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपारिक गणवेशात सदंड-सघोष संचलनात स्वयंसेवक सहभागी होणार आहे. या संचलनात अंदाजे 75 ते 200 स्वयंसेवकांची उपस्थिती असेल. संचलनामध्ये घोष (बॅन्ड), जीप, चारचाकी वाहन, भगवा ध्वज व सदंड रक्षक हे वेगळे वैशिष्ट असेल. असे संघाचे शहर जिल्हा कार्यवाह सुहास वैद्य यांनी सांगितले. (Nashik RSS Sanchalan)
(हेही वाचा – Cyber Fraud : पंढरपुरातील भक्तनिवासाच्या नावे खोटी आगाऊ नोंदणी)
विजयादशमी आणि संघ संचलन हे जणू समीकरणच बनले आहे, या संचलनाची नाशिककरांना दरवर्षी उत्सुकता असते, किंबहुना वेगवेगळ्या भागातून निघाणाऱ्या या संचलनाचे मार्गावर आकर्षक रांगोळी काढून तसेच स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी करण्यातही नाशिककर पुढे असतात, काही उत्साही नागरिक या संचलनात सहभागी होत असतात. शहरातील २२ ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचलन करणार आहे. (Nashik RSS Sanchalan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community