क्षेपणास्त्र कम दारुगोळा बार्ज LSAM 12 नौदलाकडे सुपूर्द

98
क्षेपणास्त्र कम दारुगोळा बार्ज LSAM 12 नौदलाकडे सुपूर्द

भारतीय नौदलासाठी एमएसएमई शिपयार्ड मेसर्स सेकॉन इंजिनीअरिंग प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, विशाखापट्टणमने तयार केलेल्या ‘क्षेपणास्त्र कम दारुगोळा बार्ज, एलएसएएम 12 (यार्ड 80)’ (LSAM 12) 10 ऑक्टोबर 2024 रोजी मेसर्स विनयगा मरीन पेट्रो लिमिटेड, मीरा भाईंदर, महाराष्ट्र (मेसर्स सेकॉन इंजिनीअरिंग प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे लॉन्च साइट) येथे नौदलाकडे सुपूर्द करण्यात आला. 08 x क्षेपणास्त्र कम ॲम्युनिशन बार्ज प्रकल्पातील हा सहावा बार्ज आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कमोडोर एमव्ही राज कृष्णा, सीओवाई (एमबीआय) होते.

(हेही वाचा – Mhada Lottery 2024 : सर्वसामन्यांसाठी खुशखबर! कोकण आणि पुणे मंडळाच्या 18,920 घरांच्या विक्रीची प्रक्रिया सुरु )

08 x क्षेपणास्त्र आणि दारुगोळा बार्जच्या निर्मितीसाठी 9 फेब्रुवारी 2021 रोजी संरक्षण मंत्रालय आणि सेकॉन इंजिनीअरिंग प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, विशाखापट्टणम यांच्यात करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. या बार्जेसच्या उपलब्धतेमुळे भारतीय नौदलाच्या परिचालन वचनबद्धतेला चालना मिळेल आणि जेटींच्या बाजूने आणि बाहेरच्या बंदरांवर भारतीय नौदलाच्या जहाजांना वाहतूक, वस्तू/दारूगोळा उतरवणे सुलभ होईल. (LSAM 12)

(हेही वाचा – Nashik RSS Sanchalan : विजयादशमी निमित्त नाशिकमध्ये संघाचे 22 ठिकाणी संचलन)

या बार्जेसची रचना स्वदेशी असून संबंधित नौदल नियम आणि भारतीय नौवहन नोंदणीचे नियमन अंतर्गत तयार केले आहेत. नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळा, विशाखापट्टणम येथे डिझाईनच्या टप्प्यात बार्जची नमुना चाचणी घेण्यात आली. हे बार्जेस केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाचे गौरवशाली ध्वजवाहक आहेत. (LSAM 12)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.