‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’च्या वतीने देण्यात येणारे गिर्यारोहण क्षेत्रासाठीच्या ‘शिखर सावरकर पुरस्कार २०२४’ शुक्रवार दि. ११ ऑक्टोबर रोजी प्रदान करण्यात आला. यावेळी पद्मश्री चंद्रप्रभा ऐतवाल यांना ‘शिखर सावरकर जीवनगौरव पुरस्कार – २०२४’ (Shikhar Savarkar Jeevan Gaurav Award 2024) ने सन्मानित करण्यात आले. यावेळी पद्मश्री चंद्रप्रभा ऐतवाल (Chandraprabha Aitwal) म्हणाल्या की, ‘वयाच्या ८३व्या वर्षी माझ्या सारख्या गिर्यारोहकाला सन्मानित केले जात आहे, त्याबद्दल मी सावरकर स्मारकाचे आणि स्मारकाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानते. १९७२ ला गिर्यारोहण क्षेत्रात प्रवेश केला त्यानंतर अनेक पुरस्कार मिळाले. वयाच्या या टप्प्यावर तरूणांना सांगेन की, तरूणांनी आयुष्यात एकदा तरी उंचीला गवसणी घालण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण उंचीवरूनच नवे अनुभव घेता येतात. त्यामुळे फक्त रेकॉर्डसाठी नाही तर आत्मसंतुष्टीसाठी गिर्यारोहण करायला हवे.’ स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
पद्मश्री चंद्रप्रभा ऐतवाल यांच्याविषयी
गिर्यारोहणाच्या क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी असतानाच्या काळात हिमालयीन गिर्यारोहणातील उल्लेखनीय कामगिरी चंद्रप्रभा ऐतवाल (Chandraprabha Aitwal) यांनी केली आहे. साहस आणि चंद्रप्रभा ऐतवाल अर्थात गिर्यारोहकांच्या विख्यात चंद्रादीदी हे एकाच अर्थाचे शब्द असावेत इतके चंद्रप्रभादीदी गिर्यारोहण जागतिक छंदाशी एकरूप झाल्या आहेत. (Shikhar Savarkar Jeevan Gaurav Award 2024)
केवळ हिमालय नाही, तर गिर्यारोहणातील विविधांगी साहसांकरीता जगभरातील पर्वतराजींमधील चंद्रप्रभादीदींचा (Chandraprabha Aitwal) वावर अभिमानास्पद असा आहे. त्यामुळे अखिल गिर्यारोहण समुदायात चंद्रप्रभा ऐतवाल (Chandraprabha Aitwal) या ‘दीदी’ अशा प्रेमळ व मानाच्या पदवीने सुविख्यात आहेत. भारत सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेऊन ‘पद्मश्री’ या अत्युच्च नागरी आणि नामांकित राष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. (Shikhar Savarkar Jeevan Gaurav Award 2024)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community