Trichy Airport : एयर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड ; १४० प्रवाशांसह विमान हवेत घालते घिरट्या  

251
Trichy Airport : एयर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड ; १४० प्रवाशांसह विमान हवेत घालते घिरट्या  
Trichy Airport : एयर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड ; १४० प्रवाशांसह विमान हवेत घालते घिरट्या  

तामिळनाडूमधील त्रिची विमानतळावरून (Trichy Airport) शारजाहला जाणाऱ्या विमानामध्ये तांत्रिक (Technical failure in aircraft) समस्या निर्माण झाली आहे. तांत्रिक बिघाडानंतर विमान पुन्हा विमानतळाकडे वळवण्यात आले आहे. त्रिचीहून शारजाहला (Trichy to Sharjah) जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात (Air India plane) लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या विमान इंधन जाळण्यासाठी आकाशात घिरट्या घालत आहे. विमानतळावर संभाव्य बेली लँडिंगची (Bailey Landing) तयारी सुरू असून, विमानतळावर २० अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात ठेवण्यात आल्या आहेत.  (Trichy Airport)

आपत्कालीन लँडिंगची तयारी

त्रिची विमानतळाचे संचालक गोपालकृष्णन यांनी एअर इंडियाच्या (Air India plane) विमानामध्ये हायड्रॉलिक बिघाड झाल्याची माहीती दिली. हे विमान शारजाहला जाणार होते. विमानात १४० प्रवासी होते. बेली लँडिंग करण्यासाठी विमान हवेत घिरट्या घालत आहे. यानंतर पायलटच्या विनंतीवरून त्रिची विमानतळावर एमरजन्सी लॅंडींग घोषित करण्यात आली आहे. तिरुचिरापल्लीहून शारजाला जाणारे AXB613 आहे. सुरक्षित लँडिंगसाठी विमानतळावर सर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्या आहेत. इंधन जाळल्यानंतर विमानाचे लँडिंग केले जाईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. (Trichy Airport)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.