क्षात्रतेज परत मिळवण्यासाठी Rifle Shooting Training महत्त्वाचे – रणजित सावरकर

133
क्षात्रतेज परत मिळवण्यासाठी Rifle Shooting Training महत्त्वाचे - रणजित सावरकर
  • खास प्रतिनिधी 

गेलेलं क्षात्रतेज परत मिळवण्यासाठी प्रत्येक शाळा, महाविद्यालयात, क्रीडा संकुलात रायफल क्लब (प्रशिक्षण केंद्र) सुरू करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी शुक्रवारी (१० ऑक्टोबर) केले.

(हेही वाचा – Shikhar Savarkar Puraskar : सावरकर स्मारकात संपन्न झाला ‘शिखर सावरकर पुरस्कार प्रदान सोहळा आणि शस्त्रपूजन’)

सावरकर म्हणजे साहस

“बाराशे वर्षांपासून आपण गुलामगिरीत होतो. तेव्हा आपण खऱ्या अर्थाने शस्त्र विसरलो. गुलामगिरी अधिक घट्ट होत गेली. शस्त्र गेलं की क्षत्रियत्व जाते. वीर सावरकर हे पहिले क्रांतिकारक ज्यांनी पहिली गुप्त क्रांतिकारक संघटना काढली आणि पुन्हा एक क्षात्रतेज निर्माण झाले. सावरकर म्हणजे साहस. ७५ वर्षांपूर्वी आपण स्वतंत्र झालो. आता पुन्हा एकदा गुलामगिरीच्या संकटाचे ढग आले आहेत. एकीकडे अतिरेकी हल्ले होताहेत, हिंसाचार, घातपात होताहेत. याच्यातून बाहेर पडायचे असेल तर पहिले हिंदूंमधील क्षात्रतेज जागृत करणे गरजेचे आहे,” असे सांगून सावरकर (Ranjit Savarkar) यांनी “शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक शाळेला रायफल क्लब काढता येतो. तुमची मुले ज्या शाळेत शिकत आहेत त्या शाळांना रायफल क्लब सुरू करण्याचा आग्रह धरा. शाळा महाविद्यालये, स्पोर्ट्स क्लबमध्ये जिथे शक्य आहे तिथे रायफल क्लब व्हावे,” असे आवाहन उपस्थितांना केले. तसेच वेळ आली तर रायफल्स मिळतील पण प्रशिक्षण नसेल तर तुम्ही काही करू शकणार नाही, म्हणून प्रशिक्षण घेणं महत्त्वाचं आहे, असे सावरकर यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – SEESCAP संस्थेचा ‘शिखर सावरकर उत्कृष्ट गिर्यारोहण संस्था २०२४’ पुरस्काराने सन्मान)

शारीरिक क्षमतेची अत्युच्च कसोटी

सध्याच्या जागतिक परिस्थितीकडे लक्ष वेधताना बांगलादेशमध्ये होणारे हिंदूंवरील अत्याचार, इस्रायलवर झालेले हल्ले यांचा संदर्भ देत सावरकर यांनी रायफल प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. गिर्यारोहण हा एक असा साहसी क्रीडाप्रकार आहे ज्यात तुमच्या मानसिक आणि शारीरिक क्षमतेची अत्युच्च कसोटी असते, असे सांगून “त्या खेळाचे पुनरुत्थान करण्यासाठी आणि त्याला राष्ट्रीयत्व देण्यासाठी सावरकर स्मरकाकडून एक शिखर सावरकर मोहीम झाली आणि त्यात भारतातले प्रमुख गिर्यारोहक होते, त्या वर्षापासून शिखर सावरकर पुरस्कार सुरू करण्यात आल्याचे सावरकर (Ranjit Savarkar) यांनी सांगितले.

(हेही वाचा – Shikhar Savarkar Jeevan Gaurav Award 2024 : ‘रेकॉर्डसाठी नाही तर आत्मसंतुष्टीसाठी गिर्यारोहण’; चंद्रप्रभा ऐतवाल यांनी व्यक्त केल्या भावना)

पुरस्कार वितरण

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने गिर्यारोहण क्षेत्रासाठीचे शिखर सावरकर पुरस्कार २०२४ (Shikhar Savarkar Puraskar) चा वितरण सोहळा शुक्रवार, ११ ऑक्टोबर २०२४ रोजी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झाला. रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्नील सावरकर आणि स्मारकाच्या सदस्या के. सरस्वती व्यासपीठावर उपस्थित होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.