१ जानेवारी रोजी घरगुती अनुदानित गॅस सिलिंडरची किंमत ६९४ रुपये होती, त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत १४० रुपयांनी वाढून सिलिंडरची किंमत ८३४.५० रुपये झाली आहे. १ जुलैपासून सिलिंडरची किंमत २५ रुपयांनी वाढला आहे.
तेल कंपन्यांनी किमती वाढवल्याने गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. मुंबईत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ८३४.५० रुपये झाली आहे. कोलकता येथे ८३५.५० तर चेन्नईमध्ये ८५०.५० रुपये किंमत झाली आहे.
(हेही वाचा : दोन दिवसांच्या अधिवेशनात भाजप मैदान मारणार? अशी आहे रणनीती)
व्यावसायिक सिलिंडर ८४ रुपयांनी वाढला!
याशिवाय व्यावसायिक सिलिंडरची किंमत ८४ रुपयांनी वाढली आहे. पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला पोहचत असतानाच आता सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. मागील वर्षी नोव्हेंबरपासून आंतराष्ट्रीय बाजारात पेट्रोलियम पदार्थ आणि कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. भारत मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात करत आहे आणि याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजाराशी संबंधित आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत वाढल्यावर देशी बाजारातही पेट्रोलियम पदार्थांच्या किमती वाढत आहेत.
अमूल दुधाचीही किंमत वाढली!
१ जुलैपासून देशभरात अमूलच्या दुधाच्या किमती २ रुपयांनी वाढली आहे. गुजरात को ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. १ वर्षांनंतर हि दूध दरवाढ करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community