“हिंदूंनी संघटित आणि मजबूत…”, बांग्लादेशातील हिंसाचारावर सरसंघचालक Mohan Bhagwat नेमकं काय म्हणाले?

388
"हिंदूंनी संघटित आणि मजबूत...", बांग्लादेशातील हिंसाचारावर सरसंघचालक Mohan Bhagwat नेमकं काय म्हणाले?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS ) स्थापनेला आज शंभर वर्षं पूर्ण होत आहेत. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने नागपूरमध्ये संघ मुख्यालयात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांचं मुख्यालयात भाषण झालं. यावेळी मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी बांगलादेशमधील (Bangladesh) परिस्थिती, इस्रायल-हमास युद्ध (Israel-Hamas war), जम्मू काश्मिरच्या निवडणुका (Elections of Jammu and Kashmir) आणि हिंदू समाजाला संघटित राहण्याचं आवाहन केलं.

‘हिंदू समाजावर अत्याचाराच्या गोष्टींची पुनरावृत्ती ‘
बांग्लादेशातील (Bangladesh) हिंसा, अत्याचारावर बोलताना सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) म्हणाले, “इतर देशांमध्ये विध्वंस घडवून आणणं, तिथली सरकारं पाडणं या गोष्टी जगात घडत असतात. आपल्या शेजारी बांगलादेशात (Bangladesh) काय घडलं? त्याची काही तात्कालिक कारणं असतीलही. पण एवढा मोठा विद्ध्वंस तेवढ्यानं होत नाही. दोन गोष्टी स्पष्ट आहेत. त्या विद्ध्वंसामुळे हिंदू समाजावर अत्याचाराच्या गोष्टींची पुनरावृत्ती झाली. कुठे काही गडबड झाली की दुर्बलांवर आपला राग काढण्याची कट्टरपंथी वृत्ती आहे. ही वृत्ती जोपर्यंत तिथे आहे, तोपर्यंत हिंदूच नव्हे, सर्वच अल्पसंख्यकांच्या डोक्यावर ही तलवार टांगती राहणार आहे.”

‘भारत पुढे जाऊ नये, अशी अनेक देशांची इच्छा’
“एका आव्हानाचा विचार आपण सगळ्यांनी करायला हवा. कारण ते आव्हान फक्त संघ किंवा हिंदू समाजासमोर नाहीये. फक्त भारतासमोरही हे आव्हान नाही. जगभरात हे आव्हान निर्माण होत आहे. ते आपण समजून घ्यायला हवं. भारत पुढे जाऊ नये, अशी इच्छाही अनेक देशांची आहे. त्यांचा विरोध होईल अशीच अपेक्षा आहे. ते वेगवेगळ्या प्रकारच्या चाली खेळतीलच. तसं होतही आहे. आजतागायत भारत सोडून इतर कोणत्या देशानं जगाच्या विकासाचा मार्ग निवडलेला नाही. आपण ते करतो.” (Mohan Bhagwat)

‘भारत सामर्थ्यशाली होऊ नये असे प्रयत्न चालू आहेत’
बांगलादेश-पाकिस्तानची भारताविरुद्ध हातमिळवणी यावर बोलताना मोहन भागवत (Mohan Bhagwat) म्हणाले, “दुसऱ्या एका गोष्टीवर आपण सगळ्यांनी लक्ष द्यायला हवं. तिथे बांगलादेशात चर्चा असते की भारतापासून आपल्याला धोका आहे. पाकिस्तान आपला मित्र आहे. त्यामुळे पाकिस्तानला सोबत घ्यायला हवं. दोघं मिळून आपण भारताला रोखू शकतो असं त्यांना वाटतं. ज्या बांग्लादेश निर्मितीमध्ये भारताचं सहकार्य राहिलं, ज्या बांगलादेशबाबत आपण कधीही वैरभाव ठेवला नाही तिथे या चर्चा होत आहेत. या चर्चा कोण करतंय? अशा चर्चा तिथे व्हाव्यात हे कोणकोणत्या देशांच्या हिताचं आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आपल्या देशातही हे असं व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. भारत सामर्थ्यशाली होऊ नये असे प्रयत्न चालू आहेत.” असं मोहन भागवत म्हणाले.

‘हिंदूंनी सशक्त राहिले पाहिजे’
इस्रायल-हमास युद्धावर बोलताना मोहन भागवत (Mohan Bhagwat) म्हणाले, “इस्रायल आणि हमासमध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे प्रत्येकजण चिंतेत आहे. आपला देश पुढे जात आहे कारण तो सर्वांना मदत करतो आहे. बांगलादेशातील हिंदूंना जगभरातील हिंदू समाजाकडून ही मदतीची आवश्यकता आहे. भारताच्या हिंदू समाजाला लक्षात यायला हवे, दुर्बल राहणे नुकसानीचे आहे. जिथे ही हिंदू आहे, त्यांनी सशक्त राहिले पाहिजे. सशक्त राहून अत्याचारी बनू नये, मात्र सशक्त बनून राहिले पाहिजे. बांगलादेशात स्थानिक कारणांमुळे हिंसक सत्तापालट झाला. त्यादरम्यान पुन्हा एकदा हिंदू समाजातील लोकांवर अत्याचार झाले. तेथील हिंदूंनी त्या अत्याचाराचा निषेध केला. यावेळी समाज संघटित झाला आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी घराबाहेर पडला, त्यामुळे थोडे संरक्षण होते. पण जोपर्यंत हा अत्याचारी मूलतत्त्ववादी स्वभाव आहे, तोपर्यंत तेथील हिंदूंसह सर्व अल्पसंख्याक समाजाच्या डोक्यावर धोक्याची टांगती तलवार राहणार आहे.” असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले आहेत. (Mohan Bhagwat)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.