-
ऋजुता लुकतुके
पाकिस्तान संघाचा मुलतान कसोटीत १ डाव आणि ४७ धावांनी झालेला पराभव हा पाकिस्तानला सलग दहावा आंतरराष्ट्रीय पराभव होता. या पराभवामुळे पाकिस्तानची कसोटी क्रमवारीत तळाला गच्छंती झाली आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आव्हान तर संपलंच आहे. पण, घरच्याच मैदानावर झालेल्या या पराभवाबरोबर संघाने काही नकोसे विक्रमही आपल्या नावावर केले आहेत. विशेष म्हणजे पहिल्या डावात ५५६ धावा करूनही पाकचा पराभव झाला. (Eng VS Pak, Multan Test)
(हेही वाचा- “मी पुन्हा सत्तेत आलो तर भारतावर…”, Donald Trump यांनी काय दिला इशारा?)
पाकच्या तळाच्या फलंदाजांपैकी अलमान आगाने ६३ धावा केल्या. आमीर जमाल ५५ धावांवर नाबाद राहिला. या दोघांनी दुसऱ्या डावात पाकिस्तानचा डाव आणि पराभव थोडा लांबवला. बाकी फलंदाज स्वस्तात बाद झाले. (Eng VS Pak, Multan Test)
Humiliation going on and on….. 😡
I think if they score even 700 in the 1st inning, still they may lose bcoz of ridiculous inferior mentality in the 2nd inning 🤷♂️
ENG thrashed PAK by an inning 🏏#PAKvsENG #MultanTest pic.twitter.com/OQedcQ8ncU— Muhammad Jafar (@jaf_hk) October 11, 2024
पाकिस्तानने केलेले काही नकोसे विक्रम पाहूया,
-
मागच्या ४ वर्षांत पाकिस्तानने घरच्या मैदानावर एकही विजय मिळवलेला नाही. १,३३१ दिवसांत पाकिस्तानचा संघ मायदेशात काहीही जिंकलेला नाही.
-
२०२२ पासून पाकिस्तानची मायदेशातील यशाची टक्केवारी शून्य टक्के इतकी आहे. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत पाकिस्तानचा संघ तळाला आहे.
-
शान मसूदच्या कप्तानी खाली खेळणारा पाकिस्तान संघ पहिल्या डावात ५०० च्या वर धावा करूनही एका डावाने पराभव स्वीकारणारा क्रिकेटच्या इतिहासातील पहिला संघ ठरला आहे.
-
एका डावात ५०० पेक्षा जास्त धावा करूनही पाकने ५ कसोटी गमावल्या आहेत. अशी कामगिरी करणारा पाकिस्तान हा पहिलाच संघ आहे
-
पाकिस्तानच्या संघाने मुलतान कसोटीत १५३ षटकं टाकली. पण, यात फक्त एक निर्धाव होतं. यापूर्वी हा नकोसा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर होता. १९३९ मध्ये आफ्रिकन संघाने इंग्लंड विरुद्ध ८८.५ षटकं टाकली होती. यात एकही निर्धाव नव्हतं.
-
शान मसूद हा पहिला कसोटी कर्णधार आहे ज्याने सलग ६ कसोटी गमावल्या आहेत.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community