Nikhat Zareen : निखत झरिनची वैयक्तिक प्रशिक्षकाची मागणी

Nikhat Zareen : निखत झरिनने दोन वेळा विश्वविजेतेपद पटकावलं आहे

348
Nikhat Zareen : निखत झरिनची वैयक्तिक प्रशिक्षकाची मागणी
Nikhat Zareen : निखत झरिनची वैयक्तिक प्रशिक्षकाची मागणी
  • ऋजुता लुकतुके 

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये निखत झरिनने ५० किलो वजनी गटात मुष्टियुद्ध प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व केलं. मेरी कोमच्या जागी यंदा ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्या निखतला चांगलं प्रदर्शन करता आलं नाही. अव्वल मानांकित वू यू इनने तिला दुसऱ्याच फेरीत हरवलं. या पराभवामुळे निखत नाराज झाली असली तरी, ‘तो दिवस माझा नव्हता,’ असं म्हणत तो विषय संपवला. त्याचवेळी निखतच्या मते तिला एका गोष्टीची जाणीव झाली आहे. वैयक्तिक प्रशिक्षक आणि तो ही परदेशी असेल तर मोठ्या स्पर्धेत त्याचा उपयोग होईल, असं निखतला वाटतं. (Nikhat Zareen)

(हेही वाचा- Mahavikas Aghadi : दसऱ्याच्या मुहुर्तावर जागावाटप जाहीर करण्याचा मविआचा निर्णय हुकला; काय झाल्या अडचणी जाणून घ्या…)

निखत ऑलिम्पिक पात्रता मिळवणारी पहिली भारतीय मुष्टियुद्ध खेळाडू होती. पण, प्रत्यक्ष ऑलिम्पिकमध्ये प्राथमिक फेरीतच तिचा पराभव झाला. ‘तो दिवसच माझा नव्हता. मला स्पर्धेत मानांकन नव्हतं. त्यामुळे वरचं मानांकन मिळवलेल्या खेळाडूशी पहिल्या फेरीतच गाठ पडली. खरंतर वू ला मी या आधी हरवलं होतं. पण, त्या दिवशी तशी कामगिरी मी करू शकले नाही,’ असं निखत म्हणाली. (Nikhat Zareen)

निखतने यापूर्वी दोनदा विश्वविजेतेपद पटकावलं आहे. आता ऑलिम्पिकनंतर तिने सराव सुरू केला असला तरी पुढील नियोजन केलेलं नाही. ते ती येत्या दिवसांत करणार आहे. पण, त्यापूर्वी तिला वैयक्तिक प्रशिक्षक हवा आहे. ‘मला आता वैयक्तिक प्रशिक्षक हवा आहे. गेली काही वर्षं मी ॲस्पायर संस्थेत सराव करत आहे. पण, सगळ्यांना बदल हवा असतो. त्यासाठी मलाही परदेशात सराव करायचा आहे. माझ्या कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे. त्यासाठी मला काही बदल करावे लागतील,’ असं निखतने पत्रकारांशी बोलताना सांगितलं. (Nikhat Zareen)

(हेही वाचा- Ind vs NZ Test Series : न्यूझीलंड विरुद्घच्या कसोटी मालिकेसाठी जसप्रीत बुमरा भारताचा उपकर्णधार)

वेगवेगळ्या शैलीत खेळणाऱ्या खेळाडूंबरोबर सराव केला तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तयार होऊ असं निखतला वाटतं. त्यासाठी तिला परदेशात सराव करायचाय. निखत सध्या ५० किलो वजनी गटात खेळते. पण, ५२ किलो गट निर्माण झाला तर तिला हवा आहे. (Nikhat Zareen)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.