गेल्या काही काळापासून होमगार्ड्सचे मानधन (Home Guards Highest salary) वाढविण्यासंदर्भात वारंवार मागणी केली जात होती. यासंदर्भात दसऱ्याच्या मुहूर्तावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ही मागणी मान्य केली असून मानधनात दुप्पट वाढ केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.
राज्यातील होमगार्ड्सचे मानधन जवळजवळ दुप्पट करण्यासंबंधीचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. प्रतिदिन 570 रुपयांवरून ते आता 1083 रुपये इतके करण्यात आले आहे.
आता हे मानधन देशात सर्वाधिक आहे.
याशिवाय विविध भत्त्यांची रक्कम सुद्धा दुप्पट करण्यात आली आहे. उपहार भत्ता 100 वरून 200 रुपये… pic.twitter.com/iIUFmzskeI— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 12, 2024
उपमुख्यमंत्री फडणवीस ट्विट करत म्हणाले, “राज्यातील होमगार्ड्सचे मानधन जवळजवळ दुप्पट करण्यासंबंधीचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. प्रतिदिन ५७० रुपयांवरून ते आता १०८३ रुपये इतके करण्यात आले आहे. आता हे मानधन देशात सर्वाधिक आहे.” (Devendra Fadnavis)
“याशिवाय विविध भत्त्यांची रक्कम सुद्धा दुप्पट करण्यात आली आहे. उपहार भत्ता 100 वरून 200 रुपये तर भोजन भत्ता 100 वरून 250 रुपये इतका करण्यात आला आहे. राज्यातील सुमारे 55,000 होमगार्डना या निर्णयाचा लाभ मिळेल. 1 ऑक्टोबर 2024 पासून ही वाढ देण्यात येईल. गेल्याच महिन्यात सुमारे 11,207 होमगार्ड्सची भरती प्रक्रिया सुद्धा पूर्ण करण्यात आली आहे. सद्या त्यांचे प्रशिक्षण करण्यात येते आहे. सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!” असं फडणवीसांनी म्हटलं आहे. (Devendra Fadnavis)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community