आज समाजाला काय झालंय? एखाद्या गाडीने एखाद्या लेकराला उडवलं, तर लोक विचारतात की गाडीच्या ड्रायव्हरची जात काय आणि उडवलेल्याची जात काय? एखाद्या नराधमाने एखाद्या लहान चिमुकलीचा जीव घेतला, तिच्यावर अत्याचार केला. तर लोक विचारतात त्या मुलीची जात काय आणि त्या अत्याचार करणाऱ्याची जात काय? हा असा समाज घडवण्यासाठी आम्ही आमच्या आयुष्यातील २२ वर्षे खपवली नाही. आम्हाला असा समाज घडवायचा नाही. आम्हाला अधिकाऱ्याचा सीआर बघून काम द्यायचं आहे. जात बघून काम देणाऱ्याची औलाद गोपीनाथ मुंडेंची नाही. आम्हाला काम करणाऱ्या माणसाच्या पाठिमागे उभं राहायचं आहे. उगीच जातीवर स्वार होणाऱ्या कुणाच्याही पाठीमागे उभं राहायचं नाही, अशा शब्दांत आमदार पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
असा दिवस उजाडू देऊ नका
लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघात जातीय संघर्षाचा फटका बसला. त्यांचा थोड्या मतांनी पराभव झाला. बीड जिल्ह्यासह टोकदार होत चाललेल्या जातीय संघर्षावर पंकजा मुंडेंनी सावरगावातील भगवान गडावर झालेल्या दसरा मेळाव्यात भाष्य केले. हा असा समाज घडवण्यासाठी आम्ही आमच्या आयुष्यातील २२ वर्षे खपवली नाही’, असे म्हणत आमदार Pankaja Munde यांनी खंत व्यक्त केली. पंकजा मुंडे खोटं बोलते का? पंकजा मुंडे थापा मारते का? पंकजा मुंडे अंधारात एक, उजेडात एक वागते का? कुणाला घाबरते का? अंधारात कुणाला जाऊन भेटते का? मी कुणाला घाबरत नाही. घाबरते ते या समोरच्या मैदानात माझं भाषण ऐकायला लोक नसतील, त्या दिवसाला घाबरते. मी भगवान बाबांना प्रार्थना करेन की, असा दिवस सुद्धा उजाडू देऊ नका. असे म्हणत पंकजा मुंडेंनी मनातील भीती बोलून दाखवली.
(हेही वाचा “हिंदूंनी संघटित आणि मजबूत…”, बांग्लादेशातील हिंसाचारावर सरसंघचालक Mohan Bhagwat नेमकं काय म्हणाले?)
निधी देण्यासाठी भेदभाव करत नाही
बीड लोकसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल पंकजा मुंडे म्हणाल्या, “या बीड जिल्ह्यातील गरीब माणसाचं भलं करण्यासाठी मी काम केलं. एकही गाव सोडलं नाही. गावात मायनस बूथ (कमी मतदान झालेलं) तरी तेवढाच निधी दिला, जितका ९० टक्के मतदान झालेल्या गावाला दिला. कधीच भेदभाव केला नाही. यावेळी गडबड झाली. ते जाऊद्या. आपल्याला ही गडबड पुसून काढायची आहे. या राज्यातील प्रत्येक जातीच्या माणसाला विश्वास वाटावा, असे नेतृत्व गोपीनाथ मुंडे होते, असेही आमदार Pankaja Munde म्हणाल्या.
Join Our WhatsApp Community